'दीर आणि मेव्हण्यासोबत माझे संबंध...', महिलेच्या अनैतिक संबंधांची कहाणी ऐकून तुम्हीही चक्रावून जाल!

मुंबई तक

02 Jul 2025 (अपडेटेड: 02 Jul 2025, 10:25 PM)

Crime News : उत्तर प्रदेशातील झांसीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. 24 जून रोजी सूनेनं आपल्या सासूची निर्घृणपणे हत्या केली आहे. पूजा जाटव (वय 29) असे सूनेचं नाव आहे. सूनेनं केलेल्या कारणाम्याने झांसी हादरून गेली आहे.

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

सूनेनंच सासूची केली हत्या

point

कारण ऐकूण हादरून जाल

Crime News : उत्तर प्रदेशातील झांसीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. 24 जून रोजी सूनेनं आपल्या सासूची निर्घृणपणे हत्या केली आहे. पूजा जाटव (वय 29) असे सूनेचं नाव आहे. सूनेनं केलेल्या कारणाम्याने झांसी हादरून गेली आहे. पूजा जाटवने सुरूवातीला आपल्या पतीवर गोळीबार करत त्याचा खून केला. त्यानंतर ती आपल्या दीरासोबत झांसीमध्ये लिव्ह इनमध्ये राहू लागली होती.

हे वाचलं का?

हेही वाचा : मुंबई: निर्दयीपणाचा कळस.. 15 दिवसांचं बाळ सोडलं लोकलमध्ये टाकलं अन्.. ती महिला कोण?

दरम्यान, तिने आपल्या बहिणीच्या साथीने आपल्या सासूची हत्या केली. त्यानंतर तब्बल 8 लाख रुपयांचे दागिने पळवले. या प्रकरणात पोलिसांनी पूजा आणि तिच्या बहिणीला अटक केली. घटनेचा खुलासा होत नाही तोवर त्या अटकेतच असतील असे सांगितले. 

घटनेचा घटनाक्रम

घडलेल्या घटनेनुसार, टहरौली ठाण्यातील कुम्हरिया येथे पूजाने आपल्याच सासूचा खून केला. सुशील देवी (वय 54) असे तिचं नाव होतं. पोलिसांनी या खूनाचा तपास केल्यानंतर आरोपी पूजाचे नाव समोर आले आहे. या प्रकरणात पूजा आणि कमलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणात अनिल नावाच्या तरुणाचा या प्रकरणात समावेश होता. 

फरार झालेला अनिल मंगळवारी रात्री चोरीचे दागिने घेऊन त्याच्या नातेवाईकांकडे गेला होता. तेव्हा पोलिसांनी अनिलवर गोळीबार केला. या गोळीबारात तो घायाळ झाला. त्याला उपचारासाठी एका मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले.

हेही वाचा : गर्लफ्रेंडनं बॉयफ्रेंडला भेटायला बोलावलं, दोघांमध्ये वाद झाला अन् गर्लफ्रेंडची सटकली थेट ब्लेडनं गुप्तांगच छाटलं

सासूच्या खूनाचा उलगडला तपास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजाने आपला दीर कल्याण सिंहसोबत लिव्ह इनमध्ये असल्याचं कबूल केलं होतं. सहा वर्षांपूर्वी कल्याण सिंहचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मेहुणा अजय आणि पूजाचा सासरा तिला आपल्या गावी कुम्हारिया येथे घेऊन गेला होता. त्यानंतर सून पूजा ही आपल्या मेहुण्यासोबत लिव्ह इनमध्ये राहू लागली होती. त्यासंबंधातून पूजाने एका लहान बाळाला जन्म दिला. गेल्या वर्षभरापासून त्यांच्या कुटुंबात वाद होऊ लागला होता. संबंधित प्रकरणात पूजाने सांगितलं की, मेहुणा आणि सासऱ्याकडे 16 एकर जमीन आहे. त्यातील 8 एकर जमीन विकून ती वेगळं राहणार होती. मेहुणा आणि तिच्या सासऱ्यांनी मान्य केलं, मात्र, तिच्या सासूने वेगळं राहण्यास विरोध केला. त्यातूनच सूनेनं सासूची हत्या केली.