BJP Leader Shocking Viral News : राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील एका ग्रामीण परिसरात धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यावर 25 वर्षाच्या सुनेनं छेडछाड आणि अश्लील कृत्य केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे 55 वर्षीय नेत्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.
ADVERTISEMENT
पीडितेच्या कुटुंबियांसह स्थानिकांचं धरणं आंदोलन सुरुच आहेत. कारण आरोपीच्या अटकेबाबत त्यांना ठोस आश्वासन देण्यात आलं नाहीय. ही घटना कोटा येथील रामगंजमंडी येथे घडली. पीडित महिलेनं तिच्या भाजप नेता असलेल्या सासऱ्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पीडितेनं आरोप केला आहे की, सासऱ्याने तिच्यासोबत छेडछाड आणि जबरदस्ती अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. तिने म्हटलंय की, एक दिवस सासरा तिच्या रुममध्ये घुसला आणि तिच्यासोबत नको ते करण्याचा प्रयत्न केला.
हे ही वाचा >> pune crime : तरुण काकीला 'I Love You' म्हणाला, भावाची सटकली, नंतर भररस्त्यात हॉकी स्टिकने केली अमानुष मारहाण
सुनेनं आरडाओरडा केला अन् रुममधून पळून गेली, नंतर..
त्यानंतर तिने आरडाओरडा केला आणि ती रुममधून पळाली. त्यानंतर पीडित महिला तातडीनं माहेरी गेली आणि घडलेल्या प्रकाराबाबत कुटुंबियांना माहिती दिली. तिने तिच्या सासूलाही याबाबत सांगितलं, परंतु, सासूने हे प्रकरण घरीच दाबण्याचा प्रयत्न केला. पण सासऱ्याचं वागणं बदललं नाही, त्यामुळे पीडितेनं पोलिसांत तक्रार दाखल केली.
पीडितेचं लग्न काही महिन्यांपूर्वी झालं होतं आणि तिचा पती कोटाच्या बाहेर राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. घरात फक्त पीडित महिला, तिची सासू आणि सासरा राहत होता. पीडितेनं म्हटलंय की, सासरा तिच्यासोबत चुकीचं कृत्य करण्याचा नेहमी प्रयत्न करायचा. त्यामुळे पीडितेनं पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि वासनांध सासऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
हे ही वाचा >> दोघींना स्विमिंग पूलजवळ नेलं अन् सामूहिक अत्याचार... निष्पाप मुलींसोबत घडलं भयानक...
ADVERTISEMENT
