दहा वर्षांपासून एकुलत्या एका मुलीवर बलात्कार, आईनेही गप्प राहण्यास सांगितले; कॉन्ट्रॅक्टर बापासोबत मुलीनं काय केलं?

मुंबई तक

• 12:40 PM • 11 Apr 2026

एका 21 वर्षीय तरुणीने आपल्या वडिलांचा क्रूर चेहरा समोर आणत त्यांना तुरुंगाची हवा खाण्यास भाग पाडले आहे. गेल्या 10 वर्षांपासून लैंगिक शोषणाची शिकार होत असलेल्या पीडितेने स्वतःच आरोपी वडिलांविरुद्ध भक्कम व्हिडिओ पुरावे गोळा केले.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

दहा वर्षांपासून एकुलत्या एका मुलीवर बलात्कार

point

आईनेही गप्प राहण्यास सांगितले

point

कॉन्ट्रॅक्टर बापासोबत मुलीनं काय केलं?

Crime News : दिल्लीच्या बुराडी परिसरातून नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका 21 वर्षीय तरुणीने आपल्या वडिलांचा क्रूर चेहरा समोर आणत त्यांना तुरुंगाची हवा खाण्यास भाग पाडले आहे. गेल्या 10 वर्षांपासून लैंगिक शोषणाची शिकार होत असलेल्या पीडितेने स्वतःच आरोपी वडिलांविरुद्ध भक्कम व्हिडिओ पुरावे गोळा केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक करून त्यांच्यावर बलात्कार आणि पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हे वाचलं का?

वयाच्या अकराव्या वर्षी अत्याचाराची सुरुवात

एफआयआरनुसार, पीडिता सध्या जपानी भाषेचा अभ्यास करत आहे. तिचे वडील व्यवसायाने कंत्राटदार आहेत. हे कुटुंब बुराडी परिसरात राहते. रंजना ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. अत्याचाराची ही मालिका तेव्हा सुरू झाली जेव्हा ती अवघ्या 11 वर्षांची होती. जानेवारी 2015 मध्ये पहिल्यांदा तिच्या वडिलांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी पीडितेची आई बाहेरगावी होती आणि ती घरी वडिलांसोबत एकटीच होती. त्यावेळी तितकीशी समजूत नसल्यामुळे आणि भीतीपोटी ती बराच काळ हे भयानक सत्य कोणालाही सांगू शकली नाही.

हे ही वाचा : सहकारी महिलेच्या छातीकडे टक लावून पाहणे, 'चोरून पाहण्याच्या' गुन्ह्यात मोडत नाही, हायकोर्टाने ‘ती’ FIR केली रद्द

आईलाही दया आली नाही

रंजनाने सांगितले की, जेव्हा ती मोठी झाली तेव्हा तिला या घृणास्पद कृत्याचा तिरस्कार वाटू लागला. तिने नैराश्यातून आत्महत्येचाही प्रयत्न केला, पण ती अपयशी ठरली. वयाच्या 16 व्या वर्षी तिने हिम्मत एकवटून आईला सर्व काही सांगितले, पण आईने तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याऐवजी तिलाच गप्प बसवले. 2018 मध्ये जेव्हा रंजना बिलासपूर येथील एम्समध्ये मानसिक समुपदेशनासाठी गेली होती, तेव्हा तिने तिथल्या डॉक्टरांना तिच्यासोबत घडणारा प्रकार सांगितला. डॉक्टरांनी जेव्हा ही गोष्ट रंजनाच्या आईला सांगितली, तेव्हा आईने मुलीला एका खोलीत तासनतास बंद करून धमकावले. दबाव आणि भीतीमुळे रंजनाला डॉक्टरांसमोर खोटे बोलावे लागले की, ती 'मानसिक भ्रमा'मुळे वडिलांवर आरोप करत होती.

हे ही वाचा : चार वर्षांपासून काकीसोबत अनैतिक संबंध, शेवटी पुतण्या आक्षेपार्ह अवस्थेत सापडलाच! काकाने काय केलं बघा..

वर्षभराच्या प्रयत्नानंतर..

नातेवाईकांच्या धमक्या आणि मित्रांना गोवण्याच्या भीतीनंतरही रंजनाने हार मानली नाही. तिने ठरवले की ती आता कायद्याची मदत घेईन, पण त्यासाठी तिला ठोस पुराव्यांची गरज होती. रंजनाने आपल्या खोलीत झोपताना मोबाईलचा कॅमेरा चोरून चालू ठेवण्यास सुरुवात केली. सुमारे एक वर्षाच्या मेहनतीनंतर तिने आपल्या वडिलांच्या काळ्या कृत्यांचे अनेक व्हिडिओ फुटेज जमा केले.

एप्रिल महिन्यात रंजनाने आपल्या एका मैत्रिणीला सर्व काही सांगितले आणि तिच्या घरून पोलिसांना फोन केला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत रंजनाची वैद्यकीय तपासणी केली आणि तिचे जबाब नोंदवले. रंजनाने दिलेल्या डिजिटल पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली. आता पोलीस या प्रकरणात रंजनाच्या आईच्या भूमिकेचीही सखोल चौकशी करत आहेत की, ती या गुन्ह्यात मूकदर्शक होती की सहभागी होती.