चार वर्षांपासून काकीसोबत अनैतिक संबंध, शेवटी पुतण्या आक्षेपार्ह अवस्थेत सापडलाच! काकाने काय केलं बघा..

मुंबई तक

एका तरुणाचे आपल्या चुलत काकीसोबत अनैतिक संबंध होते. एके रात्री तो आपल्या काकीला भेटण्यासाठी तिच्या घरात शिरला. पण पुढं काय होणार आहे याची त्याला पुसटशीही कल्पना नव्हती.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

चार वर्षांपासून काकीसोबत अनैतिक संबंध,

point

शेवटी पुतण्या आक्षेपार्ह अवस्थेत सापडलाच!

point

काकाने काय केलं बघा..

Crime News : अनैतिक संबंधांतून एका तरुणाची बेदम मारहाण करून हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी नात्याने काका लागणाऱ्या दोन व्यक्तींना आणि काकूला अटक केली आहे. हे सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. झारखंडमधील गोड्डा जिल्ह्यातील ही घटना आहे. या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करताना पोलिसांनी सांगितले की, ही घटना 8 एप्रिलच्या रात्री सुमारे 12:30 वाजता घडली. 

चार वर्षांपासून अनैतिक संबंध

संजीव कुमार यादव (मृताचे चुलत चुलते) यांनी 'डायल 112' वर माहिती दिली होती की, एक तरुण त्यांच्या घरात घुसून गोंधळ घालत आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, तिथे त्यांना एक व्यक्ती हात-पाय बांधलेल्या आणि गंभीर जखमी अवस्थेत आढळली. त्याला तातडीने सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृतदेहाची ओळख मालरामपूर येथील रहिवासी नीरज कुमार यादव म्हणून पटली आहे. पोलीस तपासात असे समोर आले आहे की, नीरजचे त्याचे चुलत काका संजीव कुमार यादव यांची पत्नी पिंकी देवी हिच्याशी गेल्या तीन-चार वर्षांपासून अनैतिक संबंध होते. या संबंधांवरून यापूर्वीही पंचायती झाल्या होत्या आणि दोन्ही कुटुंबांमध्ये वादावादीच्या घटना घडत असत.

हे ही वाचा : सहकारी महिलेच्या छातीकडे टक लावून पाहणे, 'चोरून पाहण्याच्या' गुन्ह्यात मोडत नाही, हायकोर्टाने ‘ती’ FIR केली रद्द

त्या रात्री काय घडलं?

घटनेच्या रात्री नीरज कुमार यादव कथितपणे छतावरून उडी मारून आपली काकू पिंकी देवी हिला भेटायला गेला होता. याच दरम्यान काका संजीव कुमार यादव यांनी त्याला आणि आपल्या पत्नीला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. त्यानंतर संजीव कुमार यादवने आपला भाऊ दिवाकर यादव याच्यासह नीरजला बेदम मारहाण केली, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, मृताचे वडील इंद्रदेव यादव यांच्या लेखी तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक मुकेश कुमार यांच्या सूचनेनुसार तातडीने कारवाई करण्यात आली. पोलिसांनी या घटनेत सहभागी असलेल्या दोन्ही चुलत काकांना आणि काकूला अटक करून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

हे ही वाचा : Maharashtra Weather: कोकणात सूर्यनारायण तापणार, उष्ण आणि दमट हवामानमुळे होणार लाही-लाही

पोलिस तपास काय सांगतो?

तपासादरम्यान पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली बांबूची काठी, हातोडा, दोरी आणि एक मोबाईल फोन जप्त केला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे सर्व साहित्य घटनेशी संबंधित पुरावा म्हणून जप्त करण्यात आले आहे. गोड्डा उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक रविदास यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली असून, पोलीस सध्या या प्रकरणाच्या सर्व पैलूंचा गांभीर्याने तपास करत आहेत.
 

हे वाचलं का?