Crime News: बिहारमध्ये एका 5 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. इतकेच नव्हे तर, पीडितेच्या नातेवाईकांनी याचा विरोध केल्यास त्यांना मारहाण करण्यात आली आणि या हाणामारीत मुलीच्या आईचा गर्भपात झाल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित प्रकरण हे बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यातील आहे. येथील गावात एका 5 वर्षीय मुलीवर तिच्या शेजारी राहणाऱ्या तरुणाने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पीडितेचा आरडाओरडा ऐकून आसपासचे लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्यावेळी, आरोपी तिथून फरार झाला.
ADVERTISEMENT
घटनेनंतर, पीडितेचे नातेवाईक आरोपीच्या घरी गेल्यानंतर त्यांच्यासोबत मारहाण करण्यात आली. पीडित मुलीची आई गर्भवती होती आणि मारहाणीदरम्यान तिचा गर्भपात झाला. संबंधित प्रकरणाची तक्रार मिळताच, पोलिसांनी तातडीने कारवाई करत मंगळवारी पाच आरोपींना अटक केल्याची माहिती आहे. यामध्ये, राजेश दास, मिथिलेश दास, रिंकू देवी आणि सरिता देवी या आरोपींचा समावेश आहे.
हे ही वाचा: पुणे : अजित पवारांच्या राजकीय सल्लागाराच्या कंपनीवर छापा; नेमकं काय सापडलं?
मुलीच्या वडिलांनी दाखल केली तक्रार
दरम्यान, पीडित मुलीच्या वडिलांनी गावातील 6 लोकांविरुद्ध मंगळवारी सकरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पीडिता आणि आईने पोलिसात तक्रार करताना सांगितलं की, त्यांच्या शेजारी राहणाऱ्या तरुणाने मुलीला फूस लावून गावातील एका निर्जनस्थळी नेलं आणि तिथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. सुदैवाने, मुलीचा आवाज ऐकून स्थानिक घटनास्थळी पोहोचले आणि आरोपी तरुण तिथून फरार झाला.
पोलिसांचा तपास
या घटनेनंतर, पीडितेचे नातेवाईक आरोपीच्या तरुणाच्या घरी जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांना देखील मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या मारहाणीत, गर्भवती असलेल्या पीडितेच्या आईचा गर्भपात झाला. आता, या प्रकरणासंदर्भात कारवाई करत पोलिसांनी पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच, घटनेतील मुख्य आरोपी फरार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, पीडित मुलगी आणि तिच्या आईवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT











