भयंकर! महिला शिक्षिकेला बॅटने अर्धा तास मारहाण, लातुरात नेमकं काय घडलं?

मुंबई तक

• 11:46 AM • 19 Nov 2023

लातुरध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिला शिक्षिकेला नवरा बायकोने बॅटने अर्धा तास मारहाण केली आहे. या मारहाणीत त्यांचा हात मोडला असून मारहाण करणारे ती दोघं पती पत्नी फरार झाली आहेत. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Female teacher beaten with bat for urinating near house in Latur husband and wife absconding

Female teacher beaten with bat for urinating near house in Latur husband and wife absconding

follow google news

Latur News: लातूर जिल्ह्यातील एक महिला शिक्षिकेला (Teacher) मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणाविषयी पोलिसांनी सांगितले की, शेजारी राहणाऱ्या नवरा-बायकोने (Wife Husband) घराबाहेर लघवी केल्याचा आरोप करत शिक्षिकेला बॅटने मारहाण (beaten with bat) केली आहे. पीडित शिक्षिकेच्या तक्रारीनुसार मारहाण करणाऱ्या नवरा-बायकोविरोधात गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

पती-पत्नी फरार

क्रिकेटच्या बॅटने शिक्षिकेला मारहाण केल्यामुळे त्या मारहाणीत त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या हाताला प्लास्टर घालून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. हाताला मार लागण्याबरोबरच त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुणाही दिसत आहेत. शिक्षिका आणि मारहारण करणाऱ्या दांपत्याच्या घरामध्ये फक्त शंभर फुटाचे अंतर आहे. मारहाण केल्यानंतर ही दोघंही पती-पत्नी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लघवी केल्याचं कारण

या प्रकरणाची माहिती देताना पीडित शिक्षिकेने सांगितले की, ज्या लोकांनी मला मारले आहे. त्यांच्या घराशेजारीच माझे घर आहे. माझे स्वतःचे घर असताना, आणि घरामध्ये सर्व सोयीसुविधा असतानाही त्यांच्या घराशेजारी मी का लघवी करेन असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मात्र ते हे ही विसरतात की, मी एक शिक्षिका आहे आणि मी असं काम का करेन असंही त्यांनी म्हटले आहे. शिक्षिकेला मारहाण झाल्यानंतर मारहाण करणाऱ्यांविरोधात 324, 323, 504, 506, 34 च्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा >> Mumbai Crime : मुंबईत तरुणीवर शेजारी राहणाऱ्या मुलांनीच आळीपाळीने…; उच्चभ्रू वसाहतीत काय घडलं?

मॉर्निंग वॉकला जाताना हल्ला

या प्रकरणाची माहिती देताना पीडित संगीता भोसले यांनी पोलिसांना सांगितले की, 10 नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता जेव्हा मी मॉर्निंग वॉकला घरातून बाहेर पडले. त्यावेळी गोपाळ भरतलाल दरक आणि त्यांची पत्नी सपना यांनी माझ्यावर हल्ला चढविला. नवनरा बायकोने मारहाण सुरुवात केल्यानंतर त्यांनी किमान अर्धा तास आरडाओरड केला मात्र त्यांच्या मदतीला कोणीही धावून आले नाही. मात्र किमान अर्धा तास त्यांनी मला बॅटने मारहाण केल्यामुळे हाताला गंभीर दुखापत झाली आहे.

मुलाने वाचवला जीव आईचा

नवरा-बायकोकडून बॅटने अर्धा तास मारहाण केल्यानंतर पीडित शिक्षिकेच्या मुलाने मध्यस्थी करुन मारहाण होताना त्यांना वाचवले. त्यानंतर त्यानेच तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर मारहाण करणाऱ्या नवरा-बायकोविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून ती दोघंही फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

    follow whatsapp