Crime News: एका तरुणाने आपल्या आई-वडिलांनी निर्घृणपणे हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. ही धक्कादायक घटना ओडिशाच्या कटक शहरात घडली. या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी आरोपी मुलगा आलोक कुमार दास याला अटक केल्याची माहिती आहे. तसेच, पोलिसांनी दोघांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. दीपक कुमार दास आणि त्यांची पत्नी रीटरानिया दास अशी मृतांची ओळख समोर आली आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वाद आणि संपत्तीच्या कारणावरून ही हत्या करण्यात आली. शुक्रवारी जवळपास 9 वाजताच्या सुमारास आलोकचं त्याच्या वडील आणि सावत्र आईसोबत भांडण झालं. नंतर, या वादाचं मारहाणीत रूपांतर झालं.
आई-वडिलांवर हल्ला करत निर्घृण हत्या
रागाच्या भरात आलोकने धारदार शस्त्राने आपल्या सावत्र आईवर हल्ला केला आणि या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर, त्याचे आरोपी तरुणाचे वडील दीपक कुमार दास तिथे पोहोचले आणि त्यावेळी आलोकने त्यांच्यावर सुद्धा हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या केली.
हे ही वाचा: मुंबई: डिलीव्हरी बॉय महिलेच्या घरी गेला आणि पाहता क्षणीच प्रेमात पडला, नंतर रिफंडच्या बहाण्याने मॅसेज अन्...
पत्नीला फोन केला अन् म्हणाला की...
तपासादरम्यान, या घटनेबाबत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. रिपोर्ट्सनुसार, आपल्या सावत्र आईच्या हत्येनंतर आरोपीने पत्नीला फोन केला आणि म्हणाला की, "आज मी सगळे चॅप्टर संपवले आहेत." यामुळे कुटुंबियांना आणि पोलिसांना सुद्धा धक्का बसला. संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच, पोलीस अधिकारी आणि सायंटिफिक टीमसुद्धा घटनास्थळी पोहोचली. आरोपीच्या घराचा शोध घेण्यात आला आणि दोघांचे मृतदेह एससीबी मेडिकल कॉलेज रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले. या हत्येत वापरण्यात आलेली हत्यारे जप्त केली असून फॉरेन्सिक तपास सुरू आहे.
हे ही वाचा: शेजारी राहणाऱ्या तरुणावर लग्नासाठी दबाव... नकार दिल्याने मुलाच्या अपहरणाचा रचला बनाव! नेमकं प्रकरण काय?
पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की, "आम्हाला दोन मृतदेह मिळाले आहेत आणि सुरूवातीच्या तपासात मुलानेच आपल्या आई-वडिलांची हत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. आता या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे."
ADVERTISEMENT











