अलिगढ: उत्तर प्रदेशातील अलिगढमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका बाप-मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मुलगा थेट वडिलांनाच म्हणतो, 'तुम्हाला अजून किती महिला हव्या आहेत.' त्याच वेळी, बाप मात्र, रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर नग्न अवस्थेत पडलेला दिसून येत आहे. जाणून घ्या हे नेमकं प्रकरण काय.
ADVERTISEMENT
नेमकं घडलं तरी काय?
ही घटना अलीगढ जिल्ह्यातील गांधी पार्क पोलीस स्टेशन परिसरातील आहे. येथे एका मुलाने बाथरूममध्ये आंघोळ करत असताना त्याच्या वडिलांवर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला. या भयानक हल्ल्यात वडिलांचे दोन्ही पाय तुटले. इतकेच नाही तर त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापतही झाली. घरातून विचित्र आवाज येताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. पण समोरचं दृश्य पाहून सर्व जण हादरून गेले. यावेळी लोकांचा जमाव पाहून आरोपी मुलगा पळून गेला.
हे ही वाचा>> पळून जाऊन केलं लग्न, आठवड्यानंतर पत्नीला घेऊन हॉटेल रुममध्ये गेला, पण मित्रांनी...
अवैध संबंध असल्याचा आरोप
शेजाऱ्यांनी पोलिसांना या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली. पोलिसांनी वृद्धाला गंभीर जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे, प्राथमिक उपचारानंतर, वडिलांना वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आले. दरम्यान, व्हायरल व्हिडिओमध्ये, वडील रक्ताने माखलेल्या अवस्थेत जमिनीवर नग्नावस्थेत पडलेले दिसत आहेत. त्याच वेळी, जवळ बसलेला मुलगा आकाश भारद्वाज (वय 32 वर्ष) त्याचे वडील गोपाल भारद्वाज यांच्यावर त्याच्याच कुटुंबातील अनेक महिलांशी अनैतिक संबंध ठेवत असल्याचा आरोप करत आहे.
शेजाऱ्यांशी बोलताना तो म्हणत होता की, 'बाबा, मी किती काळ शांत राहू? तो वडिलांना पुढे म्हणत होता की, कधी किरण भाभी, कधी लक्ष्मी, तर कधी नेहा... आता आणखी किती महिला तुम्हाला हव्या आहेत. तुम्ही बाप म्हणून सगळी प्रतिष्ठा गमावली आहे.'
वडिलांचा वेगळाच दावा
दरम्यान, जखमी वडील गोपाळ भारद्वाज यांनी पोलिसांना सांगितले की, 'आकाश जबरदस्तीने मालमत्ता त्याच्या नावावर करून घेऊ इच्छितो. मी नकार दिल्यावर त्याने माझ्यावर हल्ला केला. तो मला मारू इच्छित होता. तथापि, शेजाऱ्यांनी मला वेळीच वाचवले, अन्यथा मी माझा जीव गमावला असता.'
हे ही वाचा>> अल्पवयीन मुलगी बॉयफ्रेंडला भेटायला गेली, मित्रांनी मिळून तिला... मोठं कांड आलं समोर
त्याच वेळी, शेजाऱ्यांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. या प्रकरणात आणखी एक अँगल समोर आला आहे की या वडील आणि मुलीमधील भांडण दोनदा पोलिसांपर्यंत पोहोचलं होतं. प्रत्येक वेळी पोलीस स्टेशन निरीक्षक आणि पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक हे वडील आणि मुलामध्ये समेट करून प्रकरण मिटवत असत.
आता तिसऱ्यांदा मालमत्तेच्या मुलाने वडिलांवर हल्ला केला. यावेळी वडील गोपाळ म्हणाले की, त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे आणि या प्रकरणात त्यांच्या मुलावर कठोर कारवाई करण्यात यावी.
ADVERTISEMENT
