बेळगाव: बेळगावमध्ये एका डिनर पार्टी दरम्यान झालेल्या किरकोळ वादात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना यरागट्टी शहराच्या बाहेर घडली, जिथे नुकतंच विवाहित अभिषेक कोप्पडने त्याच्या शेतात मित्रांसाठी डिनर पार्टी आयोजित केली होती.
ADVERTISEMENT
डिनर पार्टी दरम्यान, विनोद मलशेट्टी (वय 30 वर्ष) आणि त्याचा मित्र विठ्ठल हरुगोप्प यांच्यात चिकन पीसवरून जोरदार भांडण झालं. असा आरोप आहे की, विठ्ठलला वाटलं की विनोदला जास्त चिकनचे जास्त पीस दिले जात आहेत आणि मला कमी पीस देण्यात येत आहेत. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला.
हे ही वाचा>> महिलेला पाठवली फ्रेंड रिक्वेस्ट, नंतर Video कॉल करत दाखवू लागला गुप्तांग, रात्री 12 वाजता काय घडलं?
किरकोळ वादातून हत्या
जेव्हा वाद झाला तेव्हा दोघेही दारूच्या नशेत होते. त्यांमुळे वादाचे रूपांतर काही क्षणातच हाणामारीत झाले. रागाच्या भरात विठ्ठलने थेट विनोदच्या पोटात चाकूने वार केला. ज्यामध्ये विनोद मलशेट्टी हा गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मुरगोडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ज्यानंतर त्यांनी आरोपी विठ्ठलला घटनास्थळावरून अटक केली.
हे ही वाचा>> दुसऱ्या महिलेसोबत सुरू होतं गॅटमॅट, पत्नीने पतीचा कार्यक्रमच करून टाकला!
पोलिसांनी आरोपीला केली अटक
बेळगावचे पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुलेड म्हणाले की, तपासात असे दिसून आले आहे की पार्टी करणारे सर्व लोक हे मद्यधुंद अवस्थते होते आणि चिकन पीस वाटण्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. पण या वादाने हिंसक वळण घेतले आणि त्याचे पर्यवसान खुनात झाले. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि पुढील तपास सुरू आहे. या घटनेवरून पुन्हा एकदा दिसून येते की नशा आणि किरकोळ वाद कसे प्राणघातक ठरू शकतात.
ADVERTISEMENT
