Crime News : उत्तर प्रदेशातील नोएडात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. पाच मुलांची आई असलेल्या एका महिलेनं एका 24 वय वर्षीय असलेल्या अविवाहित तरुणाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आहे. दोघांच्यात अनेकदा भेटीगाठी व्हायच्या. दोघेही एकमेकांशिवाय राहत नव्हते. पण सोमवारी त्यांच्यात मोठा वाद उफळला असता, प्रियकराने प्रेयसीची हत्या केली. पोलिसांनी तरुणावर हत्येचा गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : पत्नीनं एक धक्का दिला आणि पतीचा जीवच गेला.. पण नंतर पत्नीने केलं भयंकर कृत्य
नेमकं काय घडलं?
संबंधित प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश हा मूळत: बिदायूं जिल्ह्यातील हथखनी गुर गावाचा रहिवासी आहे. तो एका खासगी कंपनीत काम करतो. तो त्याची पत्नी नीरज आणि पाच मुलांसह मामुरा गावात भाडेतत्वाच्या घरात राहतात. नीरज नावाच्या महिलेचं गेल्या तीन वर्षांपासून अर्जुनवर प्रेम होते.
अर्जुन हा एका खासगी कंपनीत काम करत होता. सोमवारी सायंकाळी 6 वाजता नीरज आपल्या शेजारी राहणाऱ्या अर्जुनच्या घरात गेली. त्यावेळी अर्जुन आणि नीरज हे दोघेही एकाच घरात होते. त्यानंतर नीरजने आपल्या पत्नीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेण्यात आला. दोघांमध्ये वादविवाद झाला होता. अर्जुनने नीरजाल मारहाण केली. त्यानंतर नीरज बेशुद्ध पडली आणि जमिनीवर कोसळली.
हेही वाचा : अश्लील चाळे करणाऱ्या दोन तरुणी, प्रसिद्धीसाठी नको ते.. ! रिल्सस्टार्स तरुणींनी लावली सगळी वाट
त्यानंतर तिला एका नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर डॉक्टरांनी नीरजचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. संबंधित घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, पोलिसांनी आरोपी अर्जनला ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता, नीरजच्या मृत्यूचं कारण समोर आलं. नरीजची अर्जुनने गळा दाबून हत्या केल्याची माहिती समोर आली.
ADVERTISEMENT
