Crime News: कोलकाताच्या दक्षिणेकडील रीजेंट पार्क परिसरात एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथे एक 20 वर्षीय तरुणी तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिच्या मित्रांच्या घरी गेली असता तिच्यासोबत भयानक प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. पीडितेचा मित्र चंदन मलिकने तिला त्याचा मित्र दीपच्या घरी बोलावले, जिथे दोघांनीही तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा मुलीने आरोप केला आहे.
ADVERTISEMENT
एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, पीडिता हरिदेवपुर येथील रहिवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलं. शुक्रवारी पीडितेचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिचा मित्र चंदन मलिक तिला त्याचा मित्र दीपच्या फ्लॅवर घेऊन गेला. त्यानंतर, पीडिता तिचा वाढदिवस साजरा करून आणि जेवण करून घरी जायला निघाली असताना आरोपीने तिला थांबवलं आणि घराचं दार बंद केलं. यानंतर दोघांनीही तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
पीडितेने दाखवलं धाडस
सूत्रांच्या माहितीनुसार, शनिवारी सुमारे 10:30 वाजता पीडिता कसं तरी आरोपीच्या घरातून पळून तिच्या घरी पोहोचली. त्यावेळी पीडितेने तिच्या घरच्यांना घडलेल्या सगळ्या प्रकाराबद्दल सांगितलं आणि त्याच दिवशी यासंबंधी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.
हे ही वाचा: पत्नीसोबत झाला वाद अन् रागाच्या भरात केली हत्या, सासू-सासऱ्यांवर सुद्धा केला हल्ला अन् स्वत: गळफास घेत... नेमकं कारण काय?
पोलिसांनी केली कारवाई
पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीच्या आधारे FIR दाखल केला. आरोपींच्या विरोधात सामूहिक अत्याचार आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी सध्या फरार असून पोलीस त्या दोघांचा शोध घेत आहेत.
हे ही वाचा: मुंबईची खबर: म्हाडाची बंपर लॉटरी! 'या' लोकेशनवर मिळणार तुमचं 'Dream Home', लगेच करा अर्ज
पीडितेने तिच्या तक्रारीत म्हटलं की, काही महिन्यांपूर्वी चंदन मलिक आणि पीडितेची भेट झाली होती. आरोपीने स्वतःची ओळख दक्षिण कोलकातामधील एका मोठ्या दुर्गा पूजा समितीचा प्रमुख म्हणून करून दिली होती. या बहाण्याने त्याने पीडितेची दीपशी भेट घडवून आणली आणि तिघांमध्ये चांगली मैत्री झाली. यानंतर, आरोपीने मुलीला पूजा समितीत सहभागी करण्याचे आश्वासनही दिले.
ADVERTISEMENT
