भाच्याच्या प्रेमात मामी झाली वेडी! अनैतिक संबंधात आड येणाऱ्या पतीचा काटा काढला अन् मृतदेहाची विल्हेवाट तर...

उत्तर प्रदेशातील कानपुर जिल्ह्यात आपल्याच भाच्याच्या वेडी झालेल्या एका महिलेने तिच्या पतीची हत्या केल्याची बातमी समोर आली आहे.

अनैतिक संबंधात आड येणाऱ्या पतीचा काटा काढला अन् मृतदेहाची विल्हेवाट तर...

अनैतिक संबंधात आड येणाऱ्या पतीचा काटा काढला अन् मृतदेहाची विल्हेवाट तर...(फोटो सौजन्य: Grok AI)

मुंबई तक

• 12:09 PM • 07 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मामी आणि भाच्याचे अनैतिक संबंध..

point

अनैतिक संबंधात आड येणाऱ्या पतीचा काटा काढला अन्...

Extra Marital Affair: उत्तर प्रदेशातील कानपुर जिल्ह्यातून नातेसंबंधाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील सचेंडी परिसरात आपल्याच भाच्याच्या वेडी झालेल्या एका महिलेने तिच्या पतीची हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. इतकेच नव्हे, तर हत्येनंतर आरोपी महिलेने पुरावे नष्ट करण्यासाठी घराजवळच खड्डा खणून त्यात पतीचा मृतदेह पुरल्याचं सांगितलं जात आहे. 

हे वाचलं का?

प्रकरणातील आरोपीने मृतदेह विरघळवण्यासाठी खड्ड्यात 10 ते 12 किलो मीठ सुद्धा टाकलं. काही दिवसांनी, कुत्र्यांना त्याचा वास आला. मग त्यावेळी कुत्र्यांनी खड्डा खोदल्यानंतर त्यात मानवी हाडे आढळली. त्यानंतर, आरोपी पत्नीने तिच्या भाच्यासोबत मिळून ती हाडे तिकडून उचलली आणि कालव्याच्या प्रवाहात फेकून दिली. मामी आणि भाच्याच्या लव्ह स्टोरीमुळे झालेलं हे हत्याकांड सचेंडी पोलीस स्टेशन परिसरातील लालपुर गावातील असल्याची माहिती समोर आली आहे. 

हे ही वाचा: 'त्या' कारणावरून केली प्रेयसीची हत्या, नंतर तिचाच फोन घेऊन... 8 महिन्यांनंतर समोर आलं 'ते' सत्य!

अनैतिक संबंधात आड येत असल्यामुळे पतीची हत्या..

या हत्याप्रकरणात पोलिसांनी मृताची पत्नी आणि तिच्या भाच्याला अटक केली आहे. मामी आणि भाच्याच्या अनैतिक संबंधात पती आड येत असल्याकारणाने पत्नीने तिच्या भाच्याच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचला. त्यानंतर एके दिवशी सगळे झोपलेले असताना, भाच्याने त्याच्या मामाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून त्याची हत्या केली. नंतर, त्यांनी घराच्या मागे एक खड्डा खोदला आणि त्यात मृतदेह पुरला.

दहा महिन्यांपूर्वी म्हणजेच नोव्हेंबरमध्ये घडलेल्या या घटनेत, मृताच्या आईने ऑगस्ट महिन्यात आपला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. प्रकरणाचा तपास केला असता पोलिसांनी शनिवारी हत्येचा खुलासा केला आणि आरोपीला अटक केली.

हे ही वाचा: "माझे पप्पा लहान भावाचे जास्त लाड..." वडिलांवरील रागामुळे मोठा मुलगा नको ते करून बसला अन्...

भाच्याने केला गुन्हा कबूल 

तक्रारदार महिलेने तिच्या मुलाला गायब करण्यामागे सून आणि नातू असल्याचा संशय व्यक्त केला होता. प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की मृताची पत्नी आणि तिच्या भाच्यामध्ये प्रेमसंबंध होते. मृताच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली. यादरम्यान, आरोपी भाच्याने त्याचा गुन्हा कबूल केला. आरोपीने सांगितलं की त्याने त्याच्या मामीसोबत मिळून मामाची हत्या केली. नंतर त्यांनी घराच्या मागे एक खड्डा खणला आणि त्यात मृतदेह पुरून तो विरघळवण्यासाठी त्यावर मीठ टाकलं. 

    follow whatsapp