Palghar Shocking Crime News : लग्नाचा विषय काढल्यावर तरुणांच्या हृदयाचे ठोके वाढतात, असं म्हणतात. पण लग्न ठरल्यानंतर सर्वच वेगवेगळे स्वप्न रंगवू लागतात. पुढच्या आयुष्याबाबत खूप उत्साहित असतात. पण काही जण इतके उतावीळ होतात की, त्यांच्या आयुष्यात कधी संकट येतं, ते त्यांना कळतच नाही. अशाच प्रकारची धक्कादायक घटना पालघरमध्ये राहणाऱ्या एका तरुणासोबत घडली. लग्न ठरल्यानंतर त्याच्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले. त्याने होणाऱ्या पत्नीसोबत अशी मागणी केली, ज्यामुळे तिने नकार दिला. त्यानंतर असं काही घडलं, ज्यामुळे तरुणाला मोठा पश्चाताप झाला.
ADVERTISEMENT
पालघरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने लैंगिक संबंधाच्या हव्यासापोटी पत्नीचा बलात्कार करून हत्या केली. पीडित तरुणीच्या आईने आरोप केला की, हत्येपूर्वी त्याने तिच्यासोबत बलात्कार केला. जेव्हा घरी कोणीही नव्हतं, तेव्हा आरोपीने अशाप्रकारचं संतापजनक कृत्य केलं. पीडित महिलेच्या आईनं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी काही तासांतच आरोपीला अटक केली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
हे ही वाचा >> Govt Job: रेल्वेत नोकरी करण्यासाठी प्रयत्न करताय? RRB कडून 'या' पदांसाठी निघाली भरती...
दोन्ही कुटुंबांच्या सहमतीनं ठरलं होतं लग्न, पण नंतर..
मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील बिबलधर गावात राहणाऱ्या तरुणीचं लग्न आरोपीसोबत ठरलं होतं. दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने हे लग्न झालं होतं. घटनेच्या दिवशी पीडित महिलेचे आई-वडील शेतात काम करण्यासाठी गेले होते. त्यावेळी ती घरी एकटीच होती. तिचा होणार नवरा तिथे आला आणि शारीरिक संबंध करण्याची मागणी केली. पण तिने स्पष्ट नकार दिला.
तरुणीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला
तरीही आरोपीने तिच्यासोबत जबरदस्ती लैंगिक संबंध करण्याचा प्रयत्न केला. पण तरुणी म्हणाली की, लग्नाआधी लैंगिक संबंध करणार नाही. त्यानंतर आरोपी सैरावैरा झाला आणि त्याने तिच्यावर अत्याचार केला आणि गळा दाबून तिची हत्या केली. या घटनेनंतर आरोपी गावाजवळ असलेल्या जंगलात पळून गेला. संध्याकाळी तुरुणीचे कुटुंबीय जेव्हा घरी परतले, तेव्हा तरुणी मृत अवस्थेत असल्याचं आढळलं. पीडित तरुणीच्या आईनं तातडीनं पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्वरीत कारवाई करत आरोपीला अटक केली. दरम्यान, तरुणीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हे ही वाचा >> पत्नीसोबत झाला वाद अन् रागाच्या भरात केली हत्या, सासू-सासऱ्यांवर सुद्धा केला हल्ला अन् स्वत: गळफास घेत... नेमकं कारण काय?
ADVERTISEMENT
