Mumbai Shocking Viral News : मुंबईत एक धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. काही तरुणी एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून अनेक मुलांना फसवत होत्या. या मुली आधी अॅपच्या माध्यमातून मैत्री करायच्या. त्यानंतर भेटण्याचा बहाणा करून हॉटेलमध्ये बोलवायच्या नंतर त्यांची फसवणूक करायच्या. पोलिसांनी याप्रकरणी 6 तरुणींसह 21 लोकांना अटक केली आहे.
ADVERTISEMENT
मुलांना असं फसवलं जात होतं..
या मुलीचं काम मोठ्या प्लॅनिंगने सुरु होत होता. या तरुणी आधी डेटिंग अॅपवर एखाद्या मुलाशी बोलायच्या. त्यानंतर हळूहळू त्यांच्या विश्वास जिंकायच्या आणि हॉटेलमध्ये भेटायला बोलवायच्या. पण त्या रेस्टॉरंटमध्ये सर्वकाही आधीच सेट असायचं. वेटर, स्टाफ आणि मेन्यूसुद्धा..जेव्हा मुलं यायची, तेव्हा महागडे पदार्थ ऑर्डर केले जायचे आणि त्यानंतर त्याला खोटा बिल पे करायला सांगायच्या.
एका तरुणाने गेमच पलटी केला अन्..
मुंबईच्या बोरीवली परिसरात राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणासोबत असंच काहीसं घडलं. 11 एप्रिलला त्याची दिशा नावाच्या तरुणीसोबत डेटिंग अॅपवर ओळख झाली. त्यानंतर नंबर एक्सचेंज करून दुसऱ्याच दिवशी भेटायचं ठरवलं. दोघेही बोरीवलीच्या एका रेस्टॉरंटमध्ये भेटले. तिथे दारू, हुक्का आणि एनर्जी ड्रिंक ऑर्डर केलं. थोड्या वेळेनंतर वेटरने तरुणाला थेट 35000 रुपयांचं बिल पे करायला सांगितलं.
हे ही वाचा >> 'मराठीचा माज नाही, गद्दारीची लाज नाही', वैभव जोशींच्या कवितेचं विडंबन... ठाकरेंच्या शिवसेनेने शिंदेंना डिवचलं!
बिल पाहून तरुणाला बसला धक्का...
इतका मोठा बिल पाहून तरुण घाबरला. त्याने पैसे देण्यास नकार दिला. परंतु, हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्याला धमकावण्यास सुरुवात केली. त्यानंतर संतापलेल्या तरुणाने 100 नंबर डायल करून पोलिसांना बोलावलं. पोलीस पोहोचताच स्टाफ शांत झाला आणि बिल 30000 रुपये केलं. दिशा नावाच्या तरुणीनं अर्ध बिल देण्याचं सांगितलं.
बिल पाहिल्यानंतर रॅकेटचा पर्दाफाश झाला
जेव्हा तरुण घरी पोहोचला आणि ट्रान्जॅक्शन चेक केलं. तेव्हा माहित झालं की, त्याने जे 15000 रुपेय दिले होते, ते रेस्टॉरंटच्या खात्यात जमा झाले नव्हेत. तर कोणाच्या तरी पर्सनल आयडीवर पाठवण्यात आले होते. त्यानंतर संशयाची सुई फिरकली. त्यानंतर तो थेट पोलिसांकडे गेला आणि सर्वकाही सांगितलं. पोलिसांनी लगेच तपास सुरु केला. सर्वात आधी त्या यूपीआय आयडीला ट्रेस केलं. त्यानंतर मुलाचे कॉल रेकॉर्ड चेक केले. जेव्हा दिशाची चौकशी करण्यात आली तेव्हा संपूर्ण रॅकेट उघडकीस आलं.
हे ही वाचा >> महाराष्ट्रातील जनतेला डिवचणारे भाजपचे दुबे आहेत तरी कोण? दुबेंचं ते विधान जसंच्या तसं...
21 लोक अटक, 6 तरुणींचा समावेश
या प्रकरणी पोलिसांनी 21 लोकांना पकडलं. ज्यामध्ये सहा महिलांचा समावेश आहे. हे सर्व लोक मिळून तरुणांना फसवायचे आणि त्यांची आर्थिक लूट करायचे. पोलीस संपूर्ण नेटवर्कचा तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
