Extra Marital Affair: प्रेम कोणत्याही वयात आणि कोणावरही होऊ शकतं, असं म्हटलं जातं. खरंतर, सध्या विवाहबाह्य संबंधांमध्ये सुद्धा वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय. उत्तर प्रदेशातील झांसी मध्ये देखील अशीच एक घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथे एका वृद्ध महिलेचं 35 वर्षीय तरुणावरच प्रेम जडलं आणि या प्रेमात ती इतकी वेडी झाली की तिने आपल्या कुटुंबियांचा कसलाच विचार न करता थेट आपल्या प्रियकरासोबत पळून गेली. इतकेच नव्हे तर घरातून पळून जाताना ती आपल्यासोबत घरातील पैसे आणि दागिने सुद्धा घेऊन गेल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित महिलेला दोन नातवंडं असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
ही विचित्र प्रेमकहाणी झांसीमधील मऊरानीपूर पोलीस स्टेशन हद्दीतील असल्याची माहिती समोर आली आहे. येथील स्यावरी गावात कामता प्रसाद नावाचे वृद्ध आपली पत्नी, दोन मुलं, दोन सूना आणि दोन नातवंडांसोबत राहत असल्याचं सांगितलं जात आहे. खरंतर, कामता प्रसाद यांची पत्नी सुखवती आपल्या 35 वर्षीय प्रियकरासोबत पळून गेल्याची माहिती आहे. घरातून पळून जाताना ती सोबत दागिने आणि पैसे सुद्धा घेऊन गेल्याचा आरोप आहे. यामुळे संबंधित कुटुंबियांना आर्थिक अडचणींना देखील सामोरं जावं लागत आहे.
पीडित पतीने दिली पोलिसांना माहिती
पीडित पती कामता प्रसाद यांनी आपल्या पत्नीविरुद्ध पोलिसात तक्रार करताना सांगितलं की "मी रोजंदारीवर मजूरीचं काम करणारा कामगार आहे आणि मी कष्ट करून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. अडीच वर्षांपूर्वी, मी माझ्या पत्नीसोबत भिंड-मुरैना परिसरातील वीटभट्टीवर गेलो होतो आणिआम्हाला तिथं काम मिळालं. तिथे कामाच्या ठिकाणीच माझी पत्नी सुखवतीची राठ तहसील येथील बिहुनी गावाचा रहिवासी असलेल्या अमर सिंग प्रजापतीशी मैत्री झाली. त्यानंतर, दोघांमध्ये जवळीक वाढत गेली आणि त्यांच्यामध्ये संबंध प्रस्थापित झाले. सुरुवातीला मला माझ्या पत्नीवर काहीच संशय आला नाही, पण ती दिवसभर फोनवर कोणाशी तरी बोलताना दिसायची आणि त्यावेळी मी तिचा फोन चेक केल्यानंतर त्यात मला अमरचा फोन नंबर दिसला."
हे ही वाचा: 'कोण कोणाशी युती करतो, याची चिंता नको त्याचा हिशोब आमच्याकडे..', शिंदेंचं थेट राज ठाकरेंनाही आव्हान?
कुटुंबियांकडून FIR दाखल
पुढे पीडित वृद्धाने सांगितलं की "माझ्या दोन्ही सुनांना सुखवतीवर संशय आला. त्यावेळी मी माझ्या पत्नीला यासंबंधी जाब सुद्धा विचारला आणि अमरसोबत कोणतेच संबंध ठेवू नको, अशी ताकीद दिली. पण, तिने माझं काहीच ऐकलं नाही आणि ती लपुनछपून अमरला भेटत होती. काही दिवसांपूर्वी, मी माझ्या मुलाच्या आजारावर उपचार करण्यासाठी झांसी येथे गेलो होतो. त्यावेळी, माझ्या पत्नी संधी साधून तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. इतकेच नव्हे तर घरातून पळून जाताना ती सोबत 40 हजार रुपये रोख आणि दागिने घेऊन गेले."
हे ही वाचा: बाळासाहेब असते तर तुम्हाला उलटं टाकून खालून मिरचीची धुरी दिली असती, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
"सुनांनी मला माझ्या विवाहबाह्य संबंधांबद्दल सांगितलं. यामुळे कुटुंबियांना सुद्धा मोठा धक्का बसला. इतकेच नव्हे तर ती घरातून पैसे आणि सुनांचे दागिने सुद्धा घेऊन गेली." पीडित पती आणि कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सुखवती आणि अमरचा शोध सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT
