काँग्रेस खासदाराच्या पुतण्याने केली पत्नीची हत्या, त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून संपवलं आयुष्य, 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

Congress MP Nephew Kills Wife and suicide : गुजरातच्या अहमदाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अहमदाबादमधील जजेस बंगलो रोड वरील एनआरआय टॉवरमध्ये एका क्लास वन अधिकाऱ्याने सर्व्हिस रिव्हॉल्वरने आपल्या पत्नीची हत्या करुन त्यानंतर स्वत:वरही गोळी झाडून आपले आयुष्य संपवले. विशेष म्हणजे हा अधिकारी काँग्रेसच्या खासदाराचा पुतण्या होता.

Crime News

Crime News

मुंबई तक

23 Jan 2026 (अपडेटेड: 23 Jan 2026, 12:11 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

काँग्रेस खासदाराच्या पुतण्याने केली पत्नीची हत्या

point

त्यानंतर स्वत:वर गोळी झाडत संपवलं आयुष्य

Congress MP Nephew Kills Wife and suicide : गुजरातच्या अहमदाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अहमदाबादमधील जजेस बंगलो रोड वरील एनआरआय टॉवरमध्ये एका क्लास वन अधिकाऱ्याने सर्व्हिस रिव्हॉल्वरने आपल्या पत्नीची हत्या करुन त्यानंतर स्वत:वरही गोळी झाडून आपले आयुष्य संपवले. विशेष म्हणजे हा अधिकारी  काँग्रेसचे राज्यसभा खासदार शक्तिसिंह गोहिल यांचा पुतण्या असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : बदलापुरात स्कूल व्हॅनमध्ये चार वर्षीय चिमुकलीचा विनयभंग, ड्रायव्हरला अटक, तपासात गंभीर बाब समोर

दोन महिन्यांपूर्वीच लग्न 

यशराजसिंह गोहिल (33) असं या क्लास वन अधिकाऱ्याचं नाव असून तो गुजरात मेरिटाईम बोर्डात कार्यरत होता. त्याच्या बायकोचे नाव राजेश्वरी जडेजा (30) असं असून दोन महिन्यांपूर्वीच या दोघांचं लग्न झालं होतं. विशेष म्हणजे दोघांचंही हे दुसरं लग्न होतं. 21 जानेवारी रोजी रात्री डिनर करुन दोघं घरी परतले. यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादातच यशराजसिंहने बायकोला गोळी घातली.

'त्या' रात्री काय घडलं?

21 जानेवारीच्या रात्री दोघं डिनर करुन घरी परतले. त्यानंतर काही कारणांवरुन दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली. या दरम्यान रागाच्या भरातच यशराजसिंहने सर्व्हिस रिव्हॉल्वरने बायकोच्या डोक्यात पाठीमागून गोळी घातली. यानंतर 108 वरुन  सूचना मिळाल्यानंतर अॅम्ब्युलन्स दाखल झाली. मात्र त्यांनी राजेश्वरीला मृत घोषित केले. यानंतर अॅम्ब्युलन्स जाताच यशराजसिंहने त्याच रिव्हॉल्वरने आपल्या डोक्यात गोळी मारुन आत्महत्या केली. 

हे ही वाचा : ‘बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या…’, राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य

का उचललं हे टोकाचं पाऊल?

दोघांचे मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवण्यात आल्याची माहिती अहमदाबाद झोन-1 चे डीसीपी हर्षद पटेल यांनी दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'घटनास्थळावरुन रिव्हॉल्वर जप्त करण्यात आली आहे. दोनच महिन्यांपूर्वी या दोघांचे लग्न झाल्याने प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे.' डिनरनंतर दोघांमध्ये नेमका काय वाद झाला आणि यशराजसिंहने हे टोकाचं पाऊल का उचललं याचा तपास सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं.
 

    follow whatsapp