Crime News: उत्तर प्रदेशातील मेरठ येथून एका तरुणाने आत्महत्या केल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 29 डिसेंबर रोजी पीडित रेल्वे मेंटेनन्स सुपरवायझर सुमितचा मृतदेह फाशीला लटकलेल्या अवस्थेत आढळला. कुटुंबियांच्या आरोपानुसार, सुमितने त्याच्या प्रेयसीच्या धमक्या आणि ब्लॅकमेलिंगला वैतागून स्वत:चं आयुष्य संपवलं. सुमितचे मागील चार वर्षांपासून एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते.
ADVERTISEMENT
मृताच्या कुटुंबियांनी दिली माहिती
मृताच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, जवळपास दोन वर्षांपूर्वी रीताने सुमितविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. यामध्ये, सुमितला जवळपास सहा महिने तुरुंगात राहावं लागलं होतं. त्यानंतर, सुमितच्या कुटुंबियांनी त्याच्या प्रेयसीच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये दिले आणि त्यामुळे सुमितला जामीन मिळाला.
हे ही वाचा: विवाहित महिलेला लग्नाची मागणी पण नकार मिळताच थेट गोळी झाडली अन्... आरोपीचं भयंकर कृत्य!
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सुद्धा सुमितच्या प्रेयसीने तिला लग्नाचं आमिष दाखवून त्याच्यासोबत बोलणं सुरू केलं. मात्र, तिने त्याच्यावर दबाव आणण्यास सुरूवात केली. ती सुमितला पुन्हा केसमध्ये अडकवण्याची आणि त्याच्या भावांविरोधात देखील FIR दाखल करण्याची धमकी देत होती. सुमितच्या भावाच्या म्हणण्यानुसार, प्रेयसीने भावांना सुद्धा तुरुंगात पाठवण्याची धमकी दिल्याने तो घाबरून कुटुंबियांपासून वेगळं राहत होता. तसेच, मृताच्या वडिलांनी आरोप केला की, सुमित तुरुंगात असताना सुद्धा त्याची त्याच्या प्रेयसीसोबतच लग्न करण्याची इच्छा होती. परंतु, ती नेहमी त्याच्यावर दबाव आणत होती.
हे ही वाचा: मुंबईची खबर: रेल्वे प्रशासनाचं मोठं पाऊल! आता, फुकट्या प्रवाशांची खैर नाही...
पोलिसांचा तपास
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आत्महत्या करण्यापूर्वी सुमितचं त्याच्या मैत्रिणीशी फोनवर बोलणं झालं. त्यावेळी, तो खूप रडला आणि तिला सोडून जाऊ नको, अशी विनंती करत म्हणाला की तो तिच्याशिवाय राहू शकत नाही. मात्र, तिने त्याला नकार दिल्यानंतर, सुमितने फोनवर आत्महत्या करणार असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर काही वेळातच गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी शेतात जात असलेल्या गावकऱ्यांना सुमितचा मृतदेह दिसला आणि त्यांनी लगेच पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांना एक ऑडिओ रेकॉर्डिंग सुद्धा मिळाला असून त्याच्या आधारे तपास सुरू आहे. फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा केले आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. सध्या, पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT











