Crime News : उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथील थारियांव येथे एका वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर आरोपीने असं हैवानी कृत्य केलं आणि तो फरार झाल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणात आता आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने चौकशी सुरु असताना सांगितलं की, त्याने तिला एका घरात नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केल्याचं सांगण्यात येत आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव सुनील असे आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी महायुतीच्या विजयाचा मार्ग मोकळा? 'एवढे' उमेदवार बिनविरोध विजयी
'आई शौचालयासाठी बाहेर गेली असता...'
थारियांव पोलीस ठाणे परिसराच्या हद्दीतील एका गावातील रहिवासी असलेल्या पीडितेनं अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केल्याचं वृत्त आहे. तक्रारीत म्हटलं की, 27 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास आई शौचालयासाठी बाहेर गेली असता, तिथे एका अज्ञाताने तिचं तोंड दाबलं आणि नंतर तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला.
पीडिता शुद्धीवर आली असता...
सुमारे एका तासानंतर आई शुद्धीवर आली असता, तिने घडलेला प्रकार सांगितला आणि हा प्रकार सर्वांसमोर उघडकीस आला होता. या प्रकरणी राजेंद्र सिंह म्हणाले की, पीडित वृद्ध महिला ही कधी शेतात तर कधी विहिरीजवळ अत्याचार केल्याचं सांगण्यात येत आहे. अशातच घटनास्थळी कोणतेही पुरावे अद्यापही समोर आलेले नाहीत.
हे ही वाचा : 'पनवेलमध्ये पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकली', शेकाप माजी आमदार बाळाराम पाटील संतापले
अशातच वृद्ध महिलेनं तिच्या सुनेला सांगितलं की, आरोपी सुनील कुमारने तिच्या घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अशातच आरोपी सुनीलला अटक केली आहे.
ADVERTISEMENT











