"हिच्या गर्भात जीनचं बाळ..." उपचाराच्या नावाखाली मांत्रिकाचं पीडितेसोबत मंदिरात नको ते कृत्य...

भिती आणि अंधश्रद्धेला आहारी जाऊन कुटुंबियांनी मुलीच्या उपचारांसाठी तिला त्या मांत्रिकाकडे पाठवलं. मात्र, त्यानंतर तरुणीसोबत धक्कादायक घटना घडल्याचं वृत्त आहे.

मांत्रिकाचं पीडितेसोबत मंदिरात नको ते कृत्य...

मांत्रिकाचं पीडितेसोबत मंदिरात नको ते कृत्य...

मुंबई तक

• 01:14 PM • 02 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

"हिच्या गर्भात जीनचं बाळ..." तरुणीला मांत्रिकाकडे नेलं अन्...

point

उपचाराच्या नावाखाली मांत्रिकाचं पीडितेसोबत मंदिरात नको ते कृत्य!

Crime News: उत्तर प्रदेशातील आग्रा येथून खोट्या मांत्रिक टोळीचं भयानक प्रकरण उघडकीस आलं आहे. या टोळीतील एका व्यक्तीने अल्पवयीन मुलीच्या पोटात जीनचं बाळ असल्याचं सांगून तिच्या कुटुंबियांना घाबरवलं आणि त्यांना त्यांच्या मुलीला या समस्येवरील उपचारांसाठी त्याच टोळीतील एका बाबाकडे पाठवण्यासाठी प्रवृत्त केलं. भिती आणि अंधश्रद्धेला आहारी जाऊन कुटुंबियांनी मुलीच्या उपचारांसाठी तिला त्या मांत्रिकाकडे पाठवलं. मात्र, त्यानंतर तरुणीसोबत धक्कादायक घटना घडल्याचं वृत्त आहे. 

हे वाचलं का?

अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन मांत्रिकाकडे पाठवलं...   

अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन कुटुंबियांनी कोणत्याही मेडिकल तापसणीशिवाय आपल्या मुलीला मांत्रिकाकडे पाठवण्याचं ठरवलं. त्या मांत्रिकाशी संपर्क साधला असता त्याने पुजेच्या बहाण्याने पीडितेला अमरपुरा येथील एका मंदिरात बोलवलं. मुलीला घेऊन कुटुंबीय आरोपी मांत्रिकाकडे गेलं आणि त्यावेळी, अल्पवयीन मुलगी 6 महिन्यांची गर्भवती असून तिच्या पोटात जीनचं बाळ आहे आणि हे तिच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, असं सांगून त्याने तिच्या कुटुंबियांना घाबरवलं. 

हे ही वाचा: लग्नाला 14 दिवस उरले असताना नवरी समलिंगी मैत्रिणीसोबत फरार... लेसबिअन नात्याचं धक्कादायक प्रकरण

नग्न अवस्थेत व्हिडीओ शूट केला अन्...   

आरोपानुसार, त्या मांत्रिकाने अल्पवयीन पीडितेला मंदिराच्या आवारात बनलेल्या एका खोलीत नेऊन बळजबरीने तिला कपडे काढण्यास भाग पाडलं. त्यानंतर, पीडितेने यासाठी विरोध केल्यानंतर, मांत्रिकाने तिच्या कुटुंबियांना तिची बदनामी करण्याची धमकी दिली. इतकेच नव्हे तर, त्याने तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केलं आणि नग्न अवस्थेत तिचा व्हिडीओ बनवला. 

हे ही वाचा: पालघर : सलूनमध्ये 'काश्मीर बनेगा पाकिस्तान' गाणं मोठ्या आवाजात वाजवलं, पोलिसांनी आरोपीला उचललं...

बदनामीच्या भीतीमुळे, त्या मांत्रिकाने पीडितेच्या कुटुंबाकडून जवळपास तीन लाख रुपये उकळले. घटनेनंतर, आरोपींनी पीडितेच्या कुटुंबियांना मोबाईल फोनवर शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. सध्या या प्रकरणात आरोपी मांत्रिक, त्याची पत्नी आणि त्याचा साथीदार यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

    follow whatsapp