Crime News: दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील लाजपत नगरचा रहिवासी असलेल्या 50 वर्षीय परविंदर सिंह नावाच्या तरुणाने ली-मेरिडियन हॉटेलच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचं वृत्त आहे. संबंधित घटना हॉटेलच्या 10 व्या मजल्यावरील रेस्टॉरंटजवळ घडली. संबंधित घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
12 व्या मजल्यावरून उडी मारली अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, परविंदर सिंह दुपारच्या सुमारास हॉटेलमध्ये पोहोचला आणि लिफ्टमधून 12 व्या मजल्यावर पोहोचला. तिथे पोहोचताच परविंदरने अचानक इमारतीवरून उडी मारली. लोकल सिक्योरिटी आणि हॉटेल स्टाफने लगेच पोलिसांना या घटनेची माहिती दिली. प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस त्वरीत घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला.
हे ही वाचा: मुंबईची खबर: रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! आता UTS नाही तर 'या' अॅपवरून काढा ट्रेनचा पास; एकाच अॅपवर सर्व माहिती अन् सवलत सुद्धा...
आत्महत्या करण्यामागचं नेमकं कारण काय?
ख्रिसमस सणादिवशी, मृत परविंदर सिंह हॉटेलमध्ये रहिला होता. अद्याप पीडित तरुणाची मानसिक परिस्थिती आणि त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण स्पष्ट झालं नसून पोलीस याचा तपास करत आहेत. दरम्यान, पीडित तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. तपासादरम्यान, हॉटेलच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा देखील तपास केला जात आहे.
हे ही वाचा: व्हिडीओ कॉल, धमकी अन् अश्लील व्हिडीओ... 82 वर्षीय वृद्धासोबत घडलं भयानक! नेमकं प्रकरण काय?
परिसरातील लोकांमध्ये खळबळ
संबंधित प्रकरणासंदर्भात पोलिसांनी माहिती देताना सांगितलं की, सध्या कोणतीच संशयास्पद माहिती मिळाली नसून हॉटेल स्टाफ आणि गेस्ट्सची चौकशी केली जात आहे. यामधून घटनेचं कारण लवकरच समोर येईल. ली-मेरिडिअन हॉटेल दिल्लीच्या मुख्य भागात आहे. येथे, देश-विदेशातील लोक वास्तव्य करत असल्याचं पाहायला मिळतं. आता या घटनेने हॉटेल आणि आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT











