ठाणे: 20 हजार लाच मागितली, ACB ने पोलीस अधिकाऱ्याला रंगेहात पकडलं! ठाणे पोलीस दलात खळबळ

ठाणे जिल्ह्यातून भ्रष्टाचाराचा एक गंभीर प्रकार समोर आला आहे. अँटी-करप्शन ब्यूरो (ACB) म्हणजेच भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने उल्हासनगर पोलीस स्टेशनमधील सहायक पोलीस निरीक्षकाला लाच घेताना रंगेहाथ पकडलं.

ACB ने पोलीस अधिकाऱ्याला रंगेहात पकडलं!

ACB ने पोलीस अधिकाऱ्याला रंगेहात पकडलं!

मुंबई तक

• 05:11 PM • 03 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

20 हजार लाच मागितली, ACB ने पोलीस अधिकाऱ्याला रंगेहात पकडलं!

point

ठाणे पोलीस दलात खळबळ

Thane Crime: ठाणे जिल्ह्यातून भ्रष्टाचाराचा एक गंभीर प्रकार समोर आला आहे. अँटी-करप्शन ब्यूरो (ACB) म्हणजेच भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने उल्हासनगर पोलीस स्टेशनमधील सहायक पोलीस निरीक्षकाला लाच घेताना रंगेहाथ पकडलं. या 48 वर्षीय अधिकाऱ्याचं नाव संजय धोंडिराम बिडगर असून त्याने एका प्रकरणात गुन्हेगाराला मदत करण्याच्या बदल्यात 20 हजार रुपयांची मागणी केली होती. 

हे वाचलं का?

अटक न करण्यासाठी 20 हजार रुपयांची मागणी 

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकरणातील तक्रारदार, त्याचा मुलगा आणि पत्नी यांच्याविरुद्ध उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आरोपी पोलीस अधिकाऱ्याने संबंधित तक्रारदाराला बोलवून घेतलं आणि त्यांना तसेच त्याच्या कुटुंबियांना अटक न करण्यासाठी 20 हजार रुपये देण्यास सांगितलं आणि पैसे न दिल्यास अटक करण्याची धमकी दिली. तक्रारदाराने ही रक्कम देण्यास नकार दिला आणि थेट एसीबीकडे धाव घेतली. तिथे त्याने त्याच्यासोबत घडलेल्या कृत्याबद्दल सांगितलं. 

हे ही वाचा: भ्रष्टाचाराचा मुद्दे काढले, आता अजितदादांना पहिला धक्का, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध विजयी

अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं

एसीबीने तक्रारीची प्राथमिक तपासणी केल्यानंतर एक योजना आखली. या सापळ्यात बिडगर यांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं. तसेच, त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, आरोपी अधिकाऱ्याकडून सविस्तर चौकशी केली जात आहे. 

हे ही वाचा: नवी मुंबई: पत्नी आणि तिच्या मामाकडून अश्लील व्हिडीओ पाठवून छळ, सतत चॅटिंग अन्... अखेर, तरुणाचं टोकाचं पाऊल

एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस दलात कोणत्याही स्वरूपाची लाचखोरी खपवून घेतली जाणार नाही. कायद्यापुढे सर्वजण समान असून, दोषींना कठोर शिक्षा होईल. संबंधित प्रकरण ठाणे परिसरात चर्चेचा विषय ठरल्याचं पाहायला मिळतंय. 
 

    follow whatsapp