Crime News: उत्तर प्रदेशातील कानपूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील मूळ रहिवासी असलेल्या एका तरुणाने आसाममधील दिब्रुगढ येथे फाशी घेत अत्महत्या केल्याचं वृत्त आहे. सोमवारी रात्री तरुणाचा मृतदेह महाराजपूर येथील बांबुरिया येथील त्याच्या घरी पोहोचला. त्यांच्या मुलाचा मृतदेह पाहून कुटुंबियांना मोठा धक्का बसला. तसेच, संबंधित तरुणाच्या कुटुंबियांनी एका तरुणीवर याचा आरोप केला आहे. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT
येथील महाराजपूर परिसरातील रहिवासी असलेल्या दीपू यादव नावाच्या तरुणाला सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करायची होती. त्याचं हे स्वप्न साध्य करण्यासाठी तो तयारीसाठी दिब्रुगडला गेला. गेल्या तीन वर्षांपासून दीपूचे त्याच गावात राहणाऱ्या एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. तसेच, दीपू आसामला गेल्यापासून त्याची प्रेयसी त्याला धमकावत असल्याचं सांगितलं जात आहे. खरं तर, दीपू आसामला गेल्याने तो आपल्याशी संबंध तोडेल आणि लग्न करणार नसल्याचं त्याच्या प्रेयसीला वाटत होतं.
प्रेयसीच्या धमक्यांमुळे तरुणाने संपवलं जीवन...
27 डिसेंबर रोजी दीपूला त्याच्या प्रेयसीने कॉल केला आणि जर त्याने तिच्याशी लग्न केलं नाही तर ती आत्महत्या करेल, अशी धमकी दीपूच्या प्रेयसीने तिला धमकी दिली. कुटुंबियांच्या आरोपानुसार, दीपू त्याच्या प्रेयसीच्या धमक्यांमुळे इतका त्रासला की त्याने स्वतःचं आयुष्य संपवलं. त्याने आपल्या प्रेयसीला व्हिडीओ कॉल करून तिच्यासमोर आत्महत्या केली.
हे ही वाचा: मुंबईची खबर: नवीन वर्षाच्या सुरूवातीला फिरायला जायचा प्लॅन बनवताय? मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात होणार बदल ...
पीडित तरुणाच्या कुटुंबियांच्या आरोपानुसार, दीपूच्या मोबाईल फोनच्या डिटेल्सवरून त्याने शेवटचा कॉल त्याच्या प्रेयसीला केल्याचं स्पष्ट झालं. कानपूरमध्ये आल्यानंतर, दीपूच्या कुटुंबियांनी त्याच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार केले आणि महाराजपूर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत लेखी तक्रार दाखल केली. यामध्ये, प्रेयसीमुळेच तरुणाने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिली माहिती
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणाचा तपास केला जात असून पीडितेवरील आरोप खरे आढळल्यास तिच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. पीडित दीपूच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाच्या प्रेयसीच्या कुटुंबियांना त्यांच्या प्रेमसंबंधाबद्दल कळताच त्यांचा या नात्याला विरोध होता. 10 महिन्यांपूर्वी कुटुंबियांनी दीपूला सैन्य भरतीची तयारी करण्यासाठी आसामला पाठवले होते. सध्या, पोलीस या संपूर्ण घटनेची चौकशी करत असून कॉल रेकॉर्ड आणि मोबाईल फोनमधील मॅसेजेसचा तपास केला जात आहे. प्राथमिक तपासानुसार, मृताच्या प्रेयसीने त्याला धमक्या दिल्या उघडकीस आलं आहे.
ADVERTISEMENT











