Murder News: सूरत शहरातील लसकाणा भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील विपुलनगर सोसायटीजवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका व्यक्तीचं कापलेलं मुंडकं म्हणजेच डोकं आढळलं. पण हे डोकंनेमकं कोणाचं होतं आणि हे घृणास्पद कृत्य कोणी केलं? सविस्तर जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
खोलीत व्यक्तीचं डोकं नसलेलं धड
पोलिसांनी याबद्दलची माहिती मिळताच त्यांनी तपास सुरू केला तेव्हा घटनास्थळापासून सुमारे 200 मीटर अंतरावर असलेल्या विपुलनगर सोसायटीतील एका घराच्या पहिल्या मजल्यावरील रूम नंबर 13 बराच काळ बंद असल्याचं समोर आलं. हे घर जवळच्या औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना भाड्यानं देण्यात आलं होतं, पण ही खोली रिकामी होती आणि तिचे कुलूप गंजलेलं होतं. पोलिसांनी कुलूप तोडून खोलीत प्रवेश केला असल्यास तिथलं दृश्य आणखी भयानक होतं. तिथे खोलीत एका व्यक्तीचं डोकं नसलेले धड आढळलं. कोणीतरी त्याची हत्या करून मृतदेहाचे दोन भाग करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकल्याचं स्पष्ट झालं.
हे ही वाचा: प्रियकरासोबत मिळून रचला मोठा कट! पतीची निर्घृण हत्या अन् नंतर भलतंच नाटक... नेमकं प्रकरण काय?
बँक अकाउंट नंबर
आता ही मृत व्यक्ती कोण होती? हा पोलिसांसमोर सर्वात मोठा प्रश्न होता. सुरत पोलिसांनी त्याची ओळख पटवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. गुन्हे शाखा आणि लसकाणा पोलिसांनी मिळून सात पथके तयार करून प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांना खोलीत एक छोटी डायरी सापडली. यामध्ये बँक अकाउंट नंबर लिहिलेला होता. पोलिसांना वाटलं की कदाचित हे मृत व्यक्तीचं बँक अकाउंट असावं. पण, जेव्हा हा नंबर तपासला गेला तेव्हा हे खातं ओडिशातील एका व्यक्तीचं असल्याचं आढळून आलं. सुरत पोलिसांनी ताबडतोब ओडिशा पोलिसांशी संपर्क साधला.
यानंतर, तपासात एक धक्कादायक गोष्ट उघड झाली, "ज्या व्यक्तीकडे हे खातं होतं तो दीड महिन्यापूर्वी ओडिशाला परतला होता आणि जिवंत होता!" मग ही डायरी तिथे कशी पोहोचली? आणि मृत तरुण कोण होता?
हे ही वाचा: युपीएससीच्या विद्यार्थ्याने 'त्या' एका कारणाने गुप्तांगच छाटलं, वयाच्या 14 व्या वर्षांपासूनच जाणवू लागला बदल नंतर...
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की मृताची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलिस परिसरातील लोकांची चौकशी करत असून डायमंड इंडस्ट्री पार्कजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासत असल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT
