Extra marital affairs : देशभरात सध्या अवैध संबंधात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. याच अवैध संबंधातून एका महिलेनं आणि तिच्या बॉयफ्रेंडनं मिळून पोटच्या दोन वर्षांच्या मुलीची हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, ही मुलगी त्यांच्या अवैध संबंधात अडथळा बनत होती. ही घटना तेलंगणातील मेडक जिल्ह्यातील शिवरामपेट मंडलच्या शेबरपट्टी गावातील ही मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बीड ! लेक करत होती पोलीस भरतीची तयारी, ओबीसी आरक्षण गेल्यानं वडिलांना आलं नैराश्य, नंतर टोकाचं पाऊल उचलत...
नेमकं काय घडलं?
संबंधित प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ममता आणि तिचा प्रियकर फयाज यांनी मुलीची हत्या केली. लहान मुलगी दोघांच्या अनैतिक संबंधात अडथळा निर्माण होत होती. या मुलीच्या हत्येनंतर दोघांनीही मृतदेह हा गावाच्या बाहेर वाहणाऱ्या एका नाल्याजवळ पुरला होता.
महिलेसह बॉयफ्रेंड अटकेत
ममताच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. संबंधित प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची एकूण माहिती गोळा केली. तसेच आंध्रप्रदेशातील नरसरापेट येथून आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली. त्यानंतर आरोपी महिला ममता आणि बॉयफ्रेंड फयाज यांनी गुन्ह्याचा कबुलीनामा दिला होता. अधिकाऱ्याने सांगितलं की, मृतदेह हा मोठ्या प्रमाणात कुजला होता.
हे ही वाचा : 6 वर्षाच्या मुलाच्या छातीला अन् प्रायव्हेट पार्टला हात लावत.... 32 वर्षीय तरुणाचं हैवानी कृत्य, नेमकं काय केलं?
पोलिसांनी सांगितले की, संबंधित प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. गावात शोक व्यक्त करत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या अनैतिक संबंधात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याच अनैतिक संबंधामुळे गुन्हेगारीत वाढ झालेली दिसून येत आहे. याच अवैध संबंधातून महिलेसह बॉयफ्रेंडनं आपल्याच जन्मदात्या मुलाला मारल्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी अशा अनेक घटना उघडकीस आल्या होत्या.
ADVERTISEMENT
