'त्या' कारणावरून पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या! नंतर, रक्ताने फरशीवर लिहिली सुसाइड नोट... 'असा' झाला घटनेचा उलगडा

पतीने आपल्या पत्नीची चाकू भोसकून हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. लग्नानंतर बरीच वर्षे मुलं होत नसल्याने आरोपीने पत्नीसोबत हे भयंकर कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे.

रक्ताने फरशीवर लिहिली सुसाइड नोट...

रक्ताने फरशीवर लिहिली सुसाइड नोट...

मुंबई तक

• 03:04 PM • 18 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

'त्या' कारणावरून पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या!

point

नंतर, रक्ताने फरशीवर लिहिली सुसाइड नोट...

point

'असा' झाला घटनेचा उलगडा

Crime News: पतीने आपल्या पत्नीची चाकू भोसकून हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. लग्नानंतर बरीच वर्षे मुलं होत नसल्याने आरोपीने पत्नीसोबत हे भयंकर कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. इतकेच नव्हे तर, हत्येनंतर पतीने पत्नीच्या मृतदेहाजवळ फरशीवर लिहिलं की, "मी वेडी होते, माझा पती निर्दोष आहे." पोलिसांच्या तपासादरम्यान, आरोपी पोलिसांची दिशाभूल करत राहिला. मात्र, पतीच्या वागण्यावरून पोलिसांना संशय आला. तपासादरम्यान, सर्व्हिलांस टीमला आरोपीचं लोकेशन घराच्या जवळच असल्याचं आढळलं. त्यानंतर, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची कठोर चौकशी सुरू केली. त्यावेळी, आरोपीने पत्नीची हत्या केल्याचं कबूल केलं. 

हे वाचलं का?

लग्नानंतर बरीच वर्षे मुल होत नसल्याचा राग 

खरंतर, यमुनानगर परिसरातील बारा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कचरा गावाचा  रहिवासी रोहित द्विवेदी हा त्याची पत्नी सुषमासोबत भाड्याच्या खोलीत राहत होता. रोहित एनटीपीसी बारा पावर प्लांटमध्ये सिक्योरिटी डिपार्टमेंटमध्ये कार्यरत होता. 5 वर्षांपूर्वीच त्याचं लग्न झालं होतं. मात्र, लग्नानंतर त्यांना मुल होत नसल्याने त्याचे पत्नीसोबत सतत वाद व्हायचे. दरम्यान, रोहितचे त्याच्या नात्यातीलच एका महिलेवर प्रेम जडलं आणि त्याची पत्नी त्याच्या अनैतिक संबंधाला नेहमी विरोध करायची. 

पत्नीच्या हत्येनंतर, रक्तानेच फरशीवर लिहिली सुसाइड नोट 

शुक्रवारी (14 नोव्हेंबर) सकाळी रोहितचं त्याच्या पत्नीसोबत मोठं भांडण झालं. त्यानंतर, रोहित नेहमीप्रमाणे कामासाठी घराबाहेर पडला. मात्र, संतापलेल्या पतीने पत्नीची हत्या करण्याचं ठरवलं. तो कामावरून घरी परतला आणि त्याने सुषमाच्या गळ्यावर चाकूने वार केला. त्यानंतर, रोहितने आपल्या पत्नीच्याच रक्ताने फरशीवर लिहिलं की, "मी वेडी होते. माझा पती निर्दोष आहे." पत्नीच्या हत्येनंतर, आरोपी रोहित घराच्या मागच्या मार्गावरून पळून गेला. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: आता ठाणे ते भिवंडी पर्यंतचा प्रवास केवळ 7 मिनिटांत... MMRDA चा नवा प्लॅन माहितीये?

पुरावे नष्ट करण्यासाठी वेगळंच प्लॅनिंग 

रोहितने पुरावे मिटवण्यासाठी वेगळंच प्लॅनिंग आखलं. पत्नीच्या हत्येनंतर, आरोपी पुन्हा त्याच्या ड्यूटीवर गेला. तिथून रोहितने त्याच्या पत्नीच्या मोबाईलवर बरेच कॉल केले. त्यानंतर, त्याने त्याच्या घरमालकाला फोन केला आणि आपली पत्नी फोन उचलत नसल्याचं त्याने सांगितलं. तो म्हणाला, "घरात जाऊन माझं तिच्याशी बोलणं करून द्या." त्यावेळी, घरमालक रोहितच्या घराजवळ पोहोचला आणि त्याने घराचा दरवाजा ठोठावला. मात्र, घरातील कोणीच बराच काळ दरवाजा उघडला नसल्याने रोहित सुद्धा तिथे पोहोचला. त्याने दरवाजा तोडला आणि पत्नीला त्या अवस्थेत पाहून रडू लागला. 

हे ही वाचा: नांदेड : मुलाने 16 वर्षांनंतर घेतला बापाच्या हत्येचा बदला, आरोपी जामीनावर सुटताच शस्त्रांनी वार करुन सूड उगवला

दरम्यान, हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. सुसाइड नोटची सुद्धा तपासणी करण्यात आली. प्राथमिक तपासावरून, पतीचं वागणं पोलिसांना संशयास्पद वाटू लागलं. त्यामुळे, ही हत्या नसून आत्महत्या असल्याचा त्यांना संशय आला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या अक्षराची तपासणी केली. सर्व्हिलांस टीमने सुद्धा पतीचं लोकेशन तपासलं. घटनेच्या वेळी, रोहित घराच्या जवळपास असल्याचं समोर आलं. त्यानंतर, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पतीची चौकशी केली. कठोर चौकशीदरम्यान, आरोपी पतीने त्याचा गुन्हा कबूल केला आणि पोलिसांनी त्याला अटक केली. 

    follow whatsapp