मुंबईची खबर: आता ठाणे ते भिवंडी पर्यंतचा प्रवास केवळ 7 मिनिटांत... MMRDA चा नवा प्लॅन माहितीये?

मुंबई तक

'एमएमआरडीए'कडून ठाणे आणि भिवंडीच्या थेट कनेक्शनसाठी वसई खाडीवर सहा पदरी (लेन) उड्डाणपूल बांधण्याची योजना आखण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

MMRDA चा नवा प्लॅन माहितीये?
MMRDA चा नवा प्लॅन माहितीये?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आता ठाणे ते भिवंडी पर्यंतचा प्रवास केवळ 7 मिनिटांत...

point

MMRDA च्या नव्या प्लॅनविषयी सविस्तर जाणून घ्या

Mumbai News: ठाणे ते भिवंडी पर्यंतचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या समस्येवर उपाय म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) एक नवा प्रोजेक्ट सुरू करत असल्याची बातमी समोर आली आहे. ठाणे आणि भिवंडीच्या थेट कनेक्शनसाठी वसई खाडीवर सहा पदरी (लेन) उड्डाणपूल बांधण्याची योजना आखण्यात आली आहे. या पूलाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर, हा प्रवास केवळ 5 ते 7 मिनिटांत पूर्ण होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

45 मिनिटांचा प्रवास केवळ 7 मिनिटांत... 

हा पूल ठाण्यातील कोलशेत ते भिवंडीतील काल्हेरपर्यंत विस्तारित केला जाईल. वसई क्रीकवर बांधला जाणारा हा पूल अंदाजे 2.2 किलोमीटर लांबीचा असून या प्रोजेक्टचा एकूण अंदाजे खर्च 430 कोटी रुपये असेल. या सहा पदरी (लेन) पूलाचं काम पूर्ण झाल्यानंतर, ठाणे ते भिवंडी हा 45 मिनिटांचा प्रवास केवळ काही मिनिटांतच करता येणार आहे. गुरुवारी एमएमआरडीएने या योजनेसाठी टेंडरची घोषणा केली आणि पुढील तीन वर्षांत पूलाचं बांधकाम पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे. 

हे ही वाचा: Govt Job: भारताच्या हवामान विभागात मिळवा नोकरी! तगडा पगार अन्... कधीपासून कराल अप्लाय?

वाहतूक कोंडी बऱ्याच प्रमाणात कमी होईल

सध्या, प्रवाशांना कोलशेत ते काल्हेर दरम्यान बाळकुम नाका आणि जुन्या कशेळी पुलावरून प्रवास करावा लागतो. येथे वाहतूकीची खूप वर्दळ असते आणि सणासुदीच्या काळात या मार्गावरून प्रवास करताना दोन तास सुद्धा लागतात. पण, या नव्या पूलाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील वर्दळ बऱ्याच प्रमाणात कमी होईल आणि त्यासोबतच, भिवंडीच्या कापड उद्योग सुद्धा विकसित होणार असल्याचं सांगितलं जात आहे. ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या नव्या प्रोजेक्टचं निरीक्षण करत असल्याची माहिती आहे. 

हे ही वाचा: मोठी बातमी : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानासमोर अघोरी पूजा, बारामतीत भानामतीचा धक्कादायक प्रकार

प्रोजेक्ट तीन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा 

काही वर्षांपूर्वी या पुलाचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला होता. त्यावेळी 1.64  किलोमीटर लांबीचा पूल बांधण्याची योजना आखण्यात आली होती आणि त्या प्रोजेक्टचा खर्च अंदाजे 274 कोटी रुपये इतका होता. परंतु, प्रोजेक्टसाठी जागेची निवड न झाल्यामुळे या कामाला विलंब झाला. आता सर्व आवश्यक अहवाल सादर करण्यात आले असून आता हा बहुप्रतिक्षित प्रोजेक्ट तीन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp