Govt Job: भारताच्या हवामान विभागात मिळवा नोकरी! तगडा पगार अन्... कधीपासून कराल अप्लाय?
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून प्रोजेक्ट पोझीशनच्या रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भारताच्या हवामान विभागात मिळवा नोकरी!
हवामान विभागाच्या भरतीसाठी कधीपासून कराल अप्लाय?
किती मिळेल वेतन?
Govt Job: सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी नव्या भरतीची बातमी समोर आली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून प्रोजेक्ट पोझीशनच्या रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. बऱ्याच काळापासून सरकारी नोकरीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. अधिकृत नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया 24 नोव्हेंबर पासून सुरू होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवार 14 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.
या भरतीसाठी उमेदवारांकडून केवळ ऑनलाइन पद्धतीने भरलेले अर्ज स्विकारले जातील. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना mausam.imd.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल.
काय आहे पात्रता?
भारतीय हवामान विभागाच्या या भरतीमध्ये पदानुसार, वेगवेगळी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली असून, त्यानुसार उमेदवार या भरतीमध्ये सहभागी होऊ शकतील. यातील बऱ्याच पदांसाठी उमेदवारांनी M.Sc उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तर काही पदांवर नियुक्त होण्यासाठी B.Tech सह डॉक्टरेट पदवी असणं अनिवार्य आहे. तसेच, यातील काही पदांसाठी उमेदवारांची निवड करताना M.Tech डिग्रीला प्राधान्य दिलं जाईल. उमेदवार यासंबंधीचं विस्तृत नोटिफिकेशन अधिकृत वेबसाइटवर तपासू शकतात.
हे ही वाचा: आधी फसवून दारू पाजली अन्... महिला होमगार्डवर 4 जणांकडून सामूहिक लैंगिक अत्याचार!
याशिवाय विज्ञान, कंप्यूटर, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम सारख्या टेक्निकल विषयात बॅचलर्स डिग्री असणारे उमेदवार सुद्धा या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तसेच, काही पदांसाठी बॅचलर्स (पदवी) डिग्रीसह उत्तम संगणकीय कौशल्य असणं अनिवार्य आहे. हवामान विभागाच्या काही प्रोजेक्ट पदांसाठी कार्याचा अनुभव असणं देखील महत्त्वाचं असल्याचं विभागाने स्पष्ट केलं.










