मोठी बातमी : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानासमोर अघोरी पूजा, बारामतीत भानामतीचा धक्कादायक प्रकार

मुंबई तक

Baramati News : मोठी बातमी : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर अघोरी पूजा, बारामतीत भानामतीचा धक्कादायक प्रकार

ADVERTISEMENT

Baramati News
Baramati News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानासमोर अघोरी पूजा

point

बारामतीत भानामतीचा धक्कादायक प्रकार

Baramati News :  बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग निवासस्थानासमोर अघोरी पूजेचे साहित्य आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सहयोग सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आज सकाळी (दि.18) भानामती केल्याचे स्पष्ट संकेत देणारा उतारा आढळला. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.

तिकीट कापण्यासाठी दडपण आणण्याचा प्रयत्न आहे का? चर्चेला उधाण 

निवडणुकीच्या तोंडावर असा प्रकार समोर आल्याने यामागचे राजकीय गणित नेमके काय? याबाबत अनेक तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. कोणाच्या उमेदवारीसाठी वातावरण तयार करण्यात हा प्रकार केला गेला का? किंवा कोणाचे तिकीट कापण्यासाठी दडपण आणण्याचा प्रयत्न आहे का? यावरही जोरदार चर्चा सुरू आहे.

हेही वाचा : नांदेड : मुलाने 16 वर्षांनंतर घेतला बापाच्या हत्येचा बदला, आरोपी जामीनावर सुटताच शस्त्रांनी वार करुन सूड उगवला

अचानक घडलेला हा प्रकार नेमका कोणाच्या हेतूने घडवून आणला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानाजवळ असा संशयास्पद उतारा मिळाल्याने राजकीय वर्तुळातही खळबळ माजली आहे. स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp