Crime News: आंध्र प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या प्रियकराची निर्घृणपणे हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. पोलिसांनी संबंधित प्रकरणातील आरोपीला अटक केल्याची माहिती आहे. ही घटना आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. मृताची ओळख रमनजिनयुलु अशी झाली असून ते गुंटूर शहरातील सीतम्म कॉलनीत राहत होते. पीडित तरुण हा ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता.
ADVERTISEMENT
खरंतर, 6 सप्टेंबर रोजी रमजिनयुलु घरातून कामासाठी बाहेर पडला आणि तेव्हापासून तो बेपत्ता झाला. त्यानंतर, मृताच्या पत्नीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रमजिनयुलु बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. त्यावेळी, पत्नीने तिला कॉलनीतील रहिवासी कोंडैयावर संशय असल्याचं पोलिसात तक्रार करताना सांगितलं.
पोलिसांनी दिलं आश्वासन...
यानंतर, पीडित तरुणाची पत्नी आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. आपला पती दहा दिवसांपूर्वी बेपत्ता झाल्याची पत्नीने सांगितलं. त्याच्यासोबत नेमकं काय झालंय? हे त्यांना माहिती नाही आणि नगरमपालेम पोलीस कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप तरुणाच्या पत्नीने केला. गुंटूरचे डीएसपी आणि सहजिल्हाधिकारी यांनी या प्रकरणासंदर्भात निदर्शकांची भेट घेतली. संध्याकाळपर्यंत रमनजिनयुलुसोबत नेमकं काय घडलं? हे उघडकीस आणण्याचं कुटुंबियांना आश्वासन देण्यात आलं. त्यानंतर, त्यांच्या तपासाला वेग मिळाला.
हे ही वाचा: आधी त्या महिलेसोबत प्रेमसंबंध, नंतर दुसरीसोबत लग्न अन् तिसऱ्या तरुणीसोबत तर... डोंबिवलीतील शिक्षकाचा घाणेरडा खेळ!
तपासादरम्यान, पत्नीला संशय असलेल्या कोंडैया नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याची कठोर चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान कोंडैयाने रमनजिनयुलुची हत्या केल्याचं कबूल केलं.
दारू पाजली आणि प्रेयसीच्या पतीची हत्या
रमनजिनयुलुची हत्या करून त्याचा मृतदेह अड्डांकी तलावात फेकून दिल्याचं आरोपीने पोलिसांना सांगितलं आणि त्यानंतर पोलिसांनी पीडित तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला. तसेच, रमनजिनयुलुचे कोंडैयाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध सुरू असल्याचं आरोपीने सांगितलं. त्यामुळे प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या रमनजिनयुलुची हत्या करण्याचा आरोपीने कट रचला. 6 तारखेला आरोपी प्रियकर कोंडैयाला शहराबाहेर घेऊन गेला आणि त्यावेळी त्याला दारू पाजली. पीडित तरुण नशेत असताना आरोपीने त्याची हत्या केली.
हे ही वाचा: Govt Job: इंजिनीअर असलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 'या' पदांसाठी निघाली मोठी भरती...
त्यानंतर, आरोपी त्याचा मृतदेह एका कारमधून अड्डांकीला घेऊन गेला आणि तिथे तो एका तलावात फेकून दिला. पोलिसांनी प्रकरणातील आरोपीला अटक केली असून यासंबंधी पुढील तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
