आधी त्या महिलेसोबत प्रेमसंबंध, नंतर दुसरीसोबत लग्न अन् तिसऱ्या तरुणीसोबत तर... डोंबिवलीतील शिक्षकाचा घाणेरडा खेळ!
डोंबिवली शहरातून एका शिक्षकाच्या घाणेरड्या कृत्याबाबत बातमी समोर आली आहे. शिक्षकाने प्रेमाच्या नावाखाली तीन महिलांची फसवणूक केल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

प्रेमाची खोटी आश्वासनं देऊन महिलांची फसवणूक...

डोंबिवलीतील शिक्षकाचा घाणेरडा खेळ!
Crime News: डोंबिवली शहरातून एका शिक्षकाच्या घाणेरड्या कृत्याबाबत बातमी समोर आली आहे. शिक्षकाने प्रेमाच्या नावाखाली तीन महिलांची फसवणूक केल्याचं सांगितलं जात आहे. राहुल तिवारी हा उल्हासनगरमधील एका नामवंत शाळेत शिक्षक होता. पण, शाळेच्या भिंतींबाहेर त्याचं आयुष्य एखाद्या चित्रपट किंवा नाटकापेक्षा कमी नव्हतं. त्या शिक्षकाने प्रेम, लिव्ह-इन रिलेशनशिप आणि विश्वासघात यासारख्या गोष्टी अनुभवल्या. पण त्यानंतर जे काही घडलं ते धक्कादायक होतं.
दुसऱ्या महिलेसोबत केलं लग्न
14 वर्षांपूर्वी या प्रकरणाला सुरूवात झाली. त्यावेळी, राहुलने एका शिक्षिकेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. त्यानंतर, दोघेही लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहू लागले आणि त्यांच्या या प्रेमसंबंधातून त्यांनी एक मुलगा देखील झाला. परंतु, मुलाचा जन्म झाल्यानंतर, राहुलने त्या शिक्षिकेशी असलेले संबंध तोडले. आता, तो दुसऱ्याच महिलेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याच्या प्रयत्नात होता. त्यानंतर, त्याने दुसऱ्या महिलेसोबत लग्न केलं. पण, त्याचं हे नातं सुद्धा अधिक काळ टिकलं नाही. राहुलने आपल्या पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. याच कारणामुळे ती आपल्या पतीला सोडून माहेरी गेली.
हे ही वाचा: खिडकीची काच तोडून घरात घुसले अन् तरुणीसोबत केलं भयंकर कृत्य! 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
तिसऱ्या प्रेमसंबंधात खोटी आश्वासनं...
आरोपी राहुल एवढ्यावरच थांबला नाही. त्याने एका तरुणीसोबत प्रेमसंबंध निर्माण केले आणि तिला प्रेमाची खोटी आश्वासनं दिली. पण, काही काळानंतर त्याने त्याच्या तिसऱ्या प्रेमसंबंधात महिलेला सुद्धा धोका दिला. अखेर, पहिल्या शिक्षिकेने धाडस दाखवून आरोपी शिक्षकाविरुद्ध मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत राहुलला ताब्यात घेतलं. 2011 पासून राहुलने महिलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांची फसवणूक करण्यास सुरूवात केली. राहुलने अशा किती महिलांची फसवणूक केली आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.
हे ही वाचा: व्हिडीओ कॉल करून तिचे स्क्रॉनशिट काढले अन् एडिट करून अश्लील फोटो व्हायरल... नंतर ब्लॅकमेल सुद्धा...
घटनेचा तपास सुरू...
या घटनेने डोंबिवली आणि संबंधित परिसरातील लोकांना मोठा धक्का बसला आहे. एका नामवंत शाळेतील शिक्षक असं घृणास्पद कृत्य करत असल्यामुळे लोक चकित झाले आहेत. सध्या, पोलीस या घटनेचा तपास करत असून तपासादरम्यान, धक्कादायक खुलासे होऊ शकत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.