Crime News: उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. येथे 2018 पासून बेपत्ता असलेला एक विवाहित पुरुष गेल्या दिवसांमध्ये सोशल मीडियावरील एका रीलमध्ये दिसला आणि ते सुद्धा कोणा दुसऱ्याच महिलेसोबत. संबंधित पुरुषाच्या पत्नीने पोलिसांकडे या सगळ्या प्रकरणाच्या तपासाची मागणी केली आणि तपासादरम्यान, एक धक्कादायक सत्य समोर आलं. नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
लग्न झाल्यानंतर वर्षभरातच नात्यात मतभेद
‘इंडिया टूडे’च्या रिपोर्टनुसार, जितेंद्र कुमार उर्फ बबलू नावाचा तरुण 2018 पासून बेपत्ता असल्याचं घोषित करण्यात आलं होतं. संबंधित तरुणाचं 2017 मध्ये शीलू नावाच्या महिलेसोबत लग्न झालं होतं. मात्र, लग्न झाल्यानंतर वर्षभरातच दोघांच्याही नात्यात मतभेद होऊ लागले. हुंडा, सोन्याची चेन आणि अंगठी यासारख्या कारणासाठी शीलूच्या सासरी तिचा छळ करण्यात आला आणि या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे शीलूला घरातून बाहेर काढल्याचं देखील सांगण्यात येत आहे. त्यानंतर, शीलूच्या घरच्यांनी तिच्या पतीविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार दाखल केली.
पत्नी आणि तिच्या घरच्यांवर आरोप
हुंड्याच्या प्रकरणासंबंधी तपास सुरू असताना जितेंद्र अचानक बेपत्ता झाला. 20 एप्रिल 2018 रोजी जितेंद्रच्या वडिलांनी आपला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर बरेच दिवस जितेंद्रचा तपास घेण्यासाठी पोलीस प्रयत्न करत होते, मात्र त्यावेळी पोलिसांच्या हाती कोणाताच पुरावा लागला नाही. कोणताच सुगावा न लागल्यास, जितेंद्रच्या कुटुंबियांनी शीलू आणि तिच्या घरच्यांवर आरोप केला आणि त्यांनीच जितेंद्रची हत्या करून मृतदेह गायब केल्याचं कुटुंबियांनी सांगितलं.
हे ही वाचा: शेतातच होत्या दोन मोठ्या खोल्या, ‘त्या’ लोकांचं सतत येणं जाणं अन्... पोलिसांनी धाड टाकताच झाला पर्दाफाश!
रीलमध्ये पती कोणा दुसऱ्याच महिलेसोबत...
रिपोर्टनुसार, बरीच वर्षे शीलू तिच्या पतीचा शोध लागेल, या आशेत जगत होती. अखेर, सात वर्षांनंतर सोशल मीडियावरील एका रीलमध्ये जितेंद्र कोणा दुसऱ्याच महिलेसोबत दिसला. त्यावेळी, जितेंद्रला ओळखल्यानंतर लगेच कोतवाली संडीला पोलीस स्टेशनमध्ये याची माहिती देण्यात आली.
पोलिसांच्या तपासात आलं समोर
पोलिसांच्या तपासात, जितेंद्रने स्वत: बेपत्ता असल्याचं नाटक केलं आणि त्याने लुधियाना येथे जाऊन दुसऱ्याच महिलेसोबत लग्न करून तिच्यासोबत नवा संसार थाटल्याचं समोर आलं. मात्र, सोशल मीडियावर त्याच्या एका रीलमुळे त्याच्या या नाटकाचा पर्दाफाश करण्यात आला.
हे ही वाचा: मावशीसोबतच पतीचे अनैतिक संबंध! पत्नीने केला विरोध अन्... लग्नानंतर अवघ्या 4 महिन्यांतच घडलं असं काही की...
संडीला पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील पुरावे आणि शीलूने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपी जितेंद्रला ताब्यात घेतलं आहे. तसेच, आरोपीवर दोन लग्न, फसवणूक आणि हुंड्यासाठी छळ यासंबंधी कायदेशीर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची पोलिसांनी माहिती दिली. सध्या, आरोपी जितेंद्र पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
