मावशीसोबतच पतीचे अनैतिक संबंध! पत्नीने केला विरोध अन्... लग्नानंतर अवघ्या 4 महिन्यांतच घडलं असं काही की...

बिहारच्या मुंगेरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लग्नाला अवघे चार महिने झाले असताना एक विवाहित महिलेने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे.

मावशीसोबतच पतीचे अनैतिक संबंध! पत्नीने केला विरोध अन्...
मावशीसोबतच पतीचे अनैतिक संबंध! पत्नीने केला विरोध अन्...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मावशीसोबतच पतीचे अनैतिक संबंध!

point

पत्नीने केला विरोध अन् घडलं भयानक...

Crime News: बिहारच्या मुंगेरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लग्नाला अवघे चार महिने झाले असताना एक विवाहित महिलेने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. खरंतर, पीडित महिलेच्या पतीचे त्याच्या मावशीसोबतच अनैतिक संबंध असल्याचा आरोप आहे. पीडित पत्नीला याबाबत कळले असता तिने या सगळ्याला विरोध केला. मात्र, नवऱ्याला समजावून देखील त्याने पत्नीचं काहीच ऐकलं नाही आणि पतीच्या या कृत्याला वैतागून लग्नाच्या 4 महिन्यानंतर पत्नीने आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे.

गळफास घेत विवाहितेची आत्महत्या  

मृत महिलेच्या कुटुंबियांनी जावई आणि सासरच्या मंडळींवर पीडितेचा छळ केल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संबंधित घटना तारापुर पोलीस स्टेशनमधील असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथे लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांनंतर एका विवाहितेने गळफास घेत स्वत:चं आयुष्य संपवलं. मृत महिलेचं नाव मौसम असं असून ती माहपूर येथील रहिवासी जितेंद्र तांती यांची मुलगी होती.

पीडित महिलेच्या कुटुंबियांचा आरोप  

कुटुंबियांचा असा आरोप आहे की, मौसमचा विवाह 5 मे रोजी लौना गावातील रहिवासी अजय तांतीशी झाला होता. जावयाचे त्याच्याच मावशीशी अनैतिक संबंध होते. आरोपी तरुणाच्या मावशीला सुद्धा चार मुले आहेत. तरीही ती तिच्या भाच्यावर प्रेम करत होती. या सगळ्या प्रकाराबद्दल पीडित महिलेला कळालं असता तिने या पतीच्या कृत्याला विरोध केला. तेव्हा अजयने म्हणजेच आरोपी पतीने स्पष्टपणे सांगितलं की “मी माझ्या मावशीला सोडणार नाही. तुला जे करायचं ते कर.” मग सासरच्या लोकांनी पीडितेला हुंड्यासाठी त्रास देण्यास सुरुवात केली. म्हणूनच संबंधित महिलेनं हे भयानक पाऊल उचलल्याच्या पीडितेच्या कुटुंबियांनी सांगितलं.

हे ही वाचा: जरांगेंची मागणी पूर्ण होऊ शकते का? जर उत्तर 'हो' असेल, तर मराठा समाजाला नेमकं किती मिळेल आरक्षण?

मृत महिलेच्या आईने दिली माहिती  

मृत महिलेच्या कुटुंबियांनी म्हटलं की “अजय आमच्या मुलीला सतत मारहाण करायचा आणि हुंड्यासाठी तिचा छळ करायचा. लग्नात जवळपास 6 लाख रुपये रोख आणि महागड्या वस्तू देण्यात आल्या होत्या, तरीही तो समाधानी नव्हता.” मृत महिलेची आई बबिता देवी म्हणाली की, तिचा जावई अजय म्हणायचा की त्याला त्याची पत्नी आवडत नाही, तिने मरून जायला हवं, त्याला तिच्या मावशीच्या मिठीत शांती मिळते. यामुळे हाताश होऊन मौसमने तिच्या माहेरी साडीने गळफास घेऊन स्वत:ला संपवलं.

हे ही वाचा: Maratha Reservation: हायकोर्टाचे आदेश आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं 'ते' विधान, आता नेमकं घडणार तरी काय?

पोलिसांचा तपास  

संबंधित घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि गावकरी घटनास्थळी पोहचले. त्यानंतर, तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. तारापुर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमॉर्टमसाठी मुंगेर येथील रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृत महिलेच्या कुटुंबियांकडून लेखी अर्ज आल्यानंतर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp