Nanded Crime: फळ विक्रेत्याने दोन्ही हात कोयत्याने तोडले, कारण फक्त हसला अन्…

मुंबई तक

18 Aug 2023 (अपडेटेड: 18 Aug 2023, 03:18 PM)

Nanded Crime News: आपल्यावर हसला या अत्यंत क्षुल्लक गोष्टीवरुन एका फळ विक्रेत्याने एका तरुण भाजी विक्रेत्याचे दोन्ही हात मनगटापासून तोडल्याची अत्यंत भयंकर घटना घडली आहे.

in nanded a fruit vendor hacked both hands of a vegetable vendor with a scythe for a trivial reason crime news

in nanded a fruit vendor hacked both hands of a vegetable vendor with a scythe for a trivial reason crime news

follow google news

नांदेड: दिवसेंदिवस माणसाची सहनशीलता कमी होऊ तो सातत्याने हिंसेकडे वळत असल्याच्या घटना समोर येत आहे. त्यामुळे मागील काही वर्षात गुन्हेगारीचं प्रमाण देखील प्रचंड वाढलं. आता अशीच एक घटना समोर आली आहे की, ज्याने पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. (in nanded a fruit vendor hacked both hands of a vegetable vendor with a scythe for a trivial reason crime news)

हे वाचलं का?

बुधवार (16 ऑगस्ट) रोजी नांदेडमधील भाग्यनगर परिसरात एका अत्यंत क्षुल्लक कारणावरून एक धक्कादायक घटना घडली. केवळ आपल्यावर हसला या अत्यंत क्षुल्लक गोष्टीवरुन एका फळ विक्रेत्याने एका तरुण भाजी विक्रेत्याचे दोन्ही हात मनगटापासून तोडल्याची अत्यंत भयंकर घटना घडली आहे.

नेमकं घडलं तरी काय?

ही घटना नांदेड शहरातील डी मार्ट परिसरातील असून दुपारी आठवडी बाजारात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. मोहम्मद अझहर मोहम्मद अजीज असे जखमी विक्रेत्याचे नाव आहे.याप्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा >> Nilima Chavan News : नीलिमा मृत्यू प्रकरणी SBI प्रोजेक्ट मॅनेजरला अटक, कारण…

मोहम्मद अझहर मोहम्मद अझीझ हा आले-लसूण विक्रीचा व्यवसाय करतो. बुधवारी तो डी मार्ट परिसरातील आठवडी बाजारात आला होता. तर त्याच्या शेजारी तरुण मोहम्मद तोहेद हा हातगाडीवर फळे विकत होता. यावेळी दोघांमध्ये काहीशी मस्करी सुरू झाली. पण त्याच दरम्यान दोघांमध्ये अचानक वादावादी सुरू झाली.

हा वाद इतका विकोपाला गेला. त्यानंतर आरोपी मोहम्मद तोहिद याने बाजारातून कोयता विकत घेतला. त्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास तो पुन्हा एकदा बाजारात आला. यावेळी त्याला मोहम्मद अझहर मोहम्मद अजीज हा समोर दिसताच त्याने कोयत्याने त्याचे चक्क दोन्ही हात मनगटापासून तोडले.

तसंच अजीजच्या पायावर व पाठीवर निर्घृणपणे वार केले.या घटनेनंतर बाजारपेठेत एकच गर्दी झाली होती.ज्यामुळे जखमी अजीजला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हे ही वाचा >> गाडीचे ‘Brake-Fail’ का होतात? तुम्ही गाडी चालवत असताना असं झालं तर काय कराल?

या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 307 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे महिनाभरापूर्वी या भाग्यनगर पोलीस ठाण्यात हात कापल्याची घटना घडली होती. त्यामुळे आता हात तोडणारी टोळी सक्रीय झाली की काय? असा सवाल सामान्य नागरिक विचारत आहे. तसेच या घटनेमुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण आहे.

डॉक्टर बनले देवदूत

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जखमी तरुणाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी मनगटाचा तुटलेला हात जोडण्यासाठी डॉक्टरांना बोलावण्यात आले. डॉ. मनिष कटरूवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तब्बल सहा तासांच्या शस्त्रक्रियेनंतर अजीजचे दोन्ही हात जोडून त्याला जीवदान दिले.

    follow whatsapp