शेतात शौचाला बसण्यावरुन वाद; बाप-लेकाने तरुणाला संपवलं, हादरवून टाकणारं प्रकरण

Crime News : शेतातील ऊस उपटल्याचा खोटा आरोप करुन एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे.  गोरा सिंह (27) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो पंजाबमधील लहिरा सौंधा गावाचा रहिवासी होता आणि मजुरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. याप्रकरणी नथाना पोलीस ठाण्यात मृताचे वडील सुखदेव सिंह यांच्या फिर्यादीवरून कुलदीप सिंह आणि त्याच्या मुलावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 10:11 AM • 10 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

शेतात शौचाला बसण्यावरुन वाद

point

बाप-लेकाने तरुणाला संपवलं

Crime News : शेतातील ऊस उपटल्याचा खोटा आरोप करुन एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे.  गोरा सिंह (27) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो पंजाबमधील लहिरा सौंधा गावाचा रहिवासी होता आणि मजुरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. याप्रकरणी नथाना पोलीस ठाण्यात मृताचे वडील सुखदेव सिंह यांच्या फिर्यादीवरून कुलदीप सिंह आणि त्याच्या मुलावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी कुलदीप सिंह याला अटक केली असून, त्याचा मुलगा अद्याप फरार आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : 12 वीच्या विद्यार्थ्याकडून शिक्षिकेचा विनयभंग! नेहमीच्या त्रासाला कंटाळून शाळा सोडली, पण शेवटी वाटेत अडवून भयंकर कृत्य

शौचाला थांबला होता गोरा सिंह

घटनेच्या दिवशी 4 फेब्रुवारी रोजी, गोरा सिंह आपल्या वडिलांसोबत पायी जात असताना वाटेत शौचासाठी शेताच्या कडेला थांबला होता. त्याच वेळी शेतमालक कुलदीप सिंह आणि त्याचा मुलगा तिथे पोहोचले. त्यांनी गोरा सिंहवर शेतातील ऊस उपटल्याचा खोटा आरोप केला. सुखदेव सिंह आणि त्यांच्या मुलाने आम्ही ऊस तोडला नसून केवळ शौचासाठी इथे आलो आहोत, असे वारंवार सांगूनही आरोपींनी त्यांचे काहीही ऐकले नाही. उलट आरोपींनी शिवीगाळ करत आक्रमक पवित्रा घेतला.

उपचारादरम्यान मृत्यू

पाहता पाहता या वादाचे रुपांतर हिंसक मारहाणीत झाले. बाप-लेकाने मिळून गोरा सिंहला लाठ्या-काठ्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी इतकी बेदम मारहाण केली की तो जागीच गंभीर जखमी झाला. मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या वडिलांनाही आरोपींनी धमकावले. या हल्ल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने वाहनाची व्यवस्था करुन गोरा सिंहला बठिंडा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी एम्स (AIIMS) बठिंडा येथे हलवण्यात आले. दुर्दैवाने, उपचारादरम्यान बुधवारी उशिरा गोरा सिंहचा मृत्यू झाला.

हे ही वाचा : प्रेयसीच्या आईलाही शिवम आवडायचा; नकार देताच आई संतापली, शिवमसोबत नेमकं काय केलं?

घरातील एकमेव कमावता व्यक्ती गेला

गोरा सिंह हा आपल्या कुटुंबातील एकमेव कमावता व्यक्ती होता, त्याच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. नथाना पोलीस ठाण्याचे एसएचओ अमरिंदर सिंह यांनी सांगितले की, पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. फरार असलेल्या आरोपी मुलाला पकडण्यासाठी पोलिसांची पथके ठिकठिकाणी छापेमारी करत आहेत. दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले आहे.
 

    follow whatsapp