मुलाचे सख्ख्या आईसोबत अनैतिक संबंध... पत्नीनेच 'ते' सत्य सांगितलं अन् अवघा महाराष्ट्र हादरला!

सोलापूरमधील कुसूर या गावातील ओगसिद्ध या व्यक्तीचे आपल्या सख्ख्या आईसोबतच अनैतिक संबंध होते. ज्यासाठी आरोपीने स्वत:च्या 9 वर्षीय मुलीची हत्या देखील केली. दरम्यान, या सगळ्याबाबत आरोपीच्या पत्नीनेच धक्कादायक माहिती दिली आहे.

मुलाचे सख्ख्या आईसोबत अनैतिक संबंध... पत्नीनेच सांगितलं हादरवून टाकणारं सत्य (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok)

मुलाचे सख्ख्या आईसोबत अनैतिक संबंध... पत्नीनेच सांगितलं हादरवून टाकणारं सत्य (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok)

मुंबई तक

• 11:04 PM • 26 May 2025

follow google news

विजयकुमार बाबर, सोलापूर: आई आणि मुलाचं नातं हे अत्यंत पवित्र असतं.. त्या नात्याला सर्व नात्यांमध्ये सर्वोच्च स्थान आहे. पण याच नात्यावर एका वासनांध व्यक्तीने काळीमा फासला आहे. सोलापूर जिल्ह्यातील कुसूर गावी ओगसिद्ध रेवणसिद्ध कोठे याचे स्वत:च्या सख्ख्या आईसोबत अनैतिक संबंध असल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं. हा किळसवाणा प्रकार खरं तर बाहेर आलाही नसता.. मात्र, ओगसिद्धच्या 9 वर्षीय मुलीने आपल्या वडिलांना आणि आजीला नको त्या अवस्थेत पाहिलं. ज्यानंतर ओगसिद्धने घाणेरडं कृत्य लपविण्यासाठी स्वत:च्या मुलीचीच हत्या केली. 

हे वाचलं का?

दरम्यान, या सगळ्या घटनेबाबत आणि आई मुलाच्या अनैतिक संबंधांबाबत ओगसिद्ध कोठे याच्या पत्नीनेच माध्यमांना माहिती दिली. मुलीच्या हत्येनंतर ओगसिद्धची सगळी कृत्य त्याचा पत्नीने समोर आणली आहे.

हे ही वाचा>> विकृतीचं टोक गाठलं! तरूणानं शारिरीक भूक भागवण्यासाठी थेट घोड्यावरच... घटना नेमकी काय?

ओगसिद्धच्या पत्नीने 'त्या' संबंधांबाबत नेमकं काय सांगितलं?

9 वर्षाच्या मुलीच्या हत्येनंतर ओगसिद्धची पत्नीने पतीला अत्यंत कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. याचबरोबर तिने नेमकं काय-काय घडलं तेही माध्यमांना सांगितलं. 'ते आईसोबत होते तेव्हा मुलीनं त्यांना पाहिलं. पण मुलीने पाहिल्यानंतर त्यांनी मुलीला मारहाण केली. सांगू नको म्हणून.. मला पण मारहाण करायचे. मला धमकी द्यायचा, गळा दाबायचा.. लाकूड, वीट जे काही हाती लागेल त्याने मारायचा. मी कोणालाही काही सांगू नये यासाठी पती मला मारहाण करायचा. तसंच माहेराहून पैसे घेऊन ये असंही वारंवार म्हणायचा.'

'आईसोबत काय-काय करत होते ते सगळं मुलगी सांगत होती. पती स्वत:च्या आईसोबत नको त्या अवस्थेत होता. तेच मुलीने पाहिलं होतं. माझा नवरा माझ्या सासूसोबत (म्हणजे त्याच्या सख्ख्या आईसोबत) होता. ते पण नको त्या अवस्थेत. तेच मुलीने पाहिलं होतं. स्वत:च्या आईसोबतच माझ्या पतीचे अनैतिक संबंध होते.'

हे ही वाचा>> Viral Video : कारमध्ये प्रियकरासोबत नको ते करताना सापडली पत्नी, पतीने 'सिंदूर' पुसलं अन्...

'नवरा आईसोबत झोपलेला होता हे पोरीनं पाहिलं होतं. त्यानंतर पोरीने मला सांगितलं की, पप्पाने मला मारलं.. पप्पा आजीसोबत झोपलेले पाहिले.. मी मुलीला गप्प राहायला सांगितलं. त्यानंतर नवऱ्याने मला पण बेदम मारहाण केली. तसंच जीवे मारण्याची धमकी देखील दिली. आता त्याने माझ्या पोरीचा जीव घेतला. त्याला शिक्षा झाली पाहिजे तरच माझ्या पोरीला न्याय मिळेल.' अशी धक्कादायक माहिती ओगसिद्धच्या पत्नीने यावेळी दिली.

आरोपीला कठोरात कठोर शिक्षेची मागणी

दरम्यान, या संपूर्ण घटनेने सोलापूरच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. कारण अशा प्रकारची घटना ही अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालवणारी आहे. त्यामुळे आरोप ओगसिद्ध याला शासनाने कठोरात कठोर शासन करावं अशी मागणी आता सर्वच थरातून होत आहे.

    follow whatsapp