Crime News : मध्य प्रदेशातील मंदसौर येथील दिल्ली-मुंबईच्या एक्सप्रेसवेवरील अश्लील व्हिडिओची चर्चा आहे. आरोपी हा भाजप पक्षाचा असल्याचं बोललं जात होते. मात्र, या व्यक्तीचा आणि आमचा कोणताही एक संबंध नसल्याचं भाजपनं सांगितलं आहे. आरोपीचं नाव हे मोहन धाकड असल्याचे सांगण्यात येत आहे. धाकडने मध्य प्रदेश तक या माध्यमासोबत बोलताना धक्कादायक दावा केला आहे. संबंधित व्हिडिओ एआय जनरेटेड असल्याचं आरोपी मनोहरलाल यांनी सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : IT कंपनीत 25 लाख रुपयांचं पॅकेज, तरी इंजिनिअर तरुणी रस्त्यावर न्यूड होऊन नको ते...
मनोहर लाल धाकड म्हणाले की, व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा खोटा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ एआय जनरेटेड आहे. या व्हिडिओबाबत फॉरेन्सिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या कारवाईनंतरच या व्हिडिओमागील खरं सत्य समोर येणार आहे. मी या प्रकरणात लक्ष्य घालत न्यायालयात माझी मतं मांडणार आहे. ज्या लोकांनी हा व्हिडिओ व्हायर करणयाचं काम केलं त्यांच्याविरोधात मानहिनीचा गुन्हा दाखल करेन.
दरम्यान, या घटनेनंतर आरोपी धाकड फरार का झाला? असा अनेकांना प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर आता स्वत: धाकडने याबाबत माहिती दिली आहे. धाकड म्हणाले की, गाडीचा नंबर प्लेट ट्रेस करुन चुकीची माहिती देऊन पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. मी त्यावेळी भयभीत झालो होतो. इतरांमुळे माझ्या प्रतिमेवर बोट केलं जात आहे. त्यामुळे मी शांत आहे.
अशावेळी धाकडने दावा केला की, धाकडने दावा केला की, जो व्हिडिओ दाखवण्यात येत आहे ती व्यक्ती मी नाही. ही कारची यापर्वीच विक्री केली असल्याचं धाकडने सांगितलं.
हेही वाचा : Pune: दिवंगत पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीवर बलात्कार; पोलिसांनी FIR साठी लावले 21 दिवस
मनोहर लाल धाकडला या प्रकरणाबाबत विचारलं की व्हिडिओतील महिला नेमकी कोण? तर त्यांनी सांगितलं की, एक्सप्रेसवेवर मी नव्हतोच. मग तिथं महिला कुठून आली? असा धाकड यांनी प्रतिसवाल केला. जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तो व्हिडिओ एआय जनरेटेड आहे, असे मनोहर लाल धाकड म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
