विकृतीचं टोक गाठलं! तरूणानं शारिरीक भूक भागवण्यासाठी थेट घोड्यावरच... घटना नेमकी काय?
Crime News : नागपूरात विकृतीचं टोक गाठणारी घटना घडली आहे. एका तरुणाने घोड्यावर अत्याचार केल्याची मन सून्न करुन टाकणारी घटना घडली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

विकृतीचं टोक गाठत मन सून्न करून टाकणारी घटना नागपूरात घडली आहे.

एका तरुणाने घोड्यावर बलात्कार केल्याचे सांगण्यात येत आहे.
Crime News : विकृतीचं टोक गाठणारी घटना नागपूरात घडली आहे. एका तरुणाने घोड्यावर बलात्कार केल्याचे सांगण्यात येत आहे. हे ऐकूण अनेकांना धक्का बसला आहे. एका व्यक्तीने घोड्यावर बलात्कार केला आहे. ही घटना 17 मे रोजी खाणकाम परिसरातील घोडेस्वारी अकादमीमध्ये घडली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून या घटनेची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा : नाश्ता, मटण, चिकन! वाल्मिक कराडला जेलमध्ये तब्बल 10 हजाराची... तुरुंगातून आलेले रंजीत कासले काय म्हणाले?
सीसीटीव्हीतून घटनेचा तपास
या घटनेतील घडलेला प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. घोडेस्वारी अकादमीतील सुरक्षारक्षकाने आरोपीला पकडले आहे. अशी विकृती करणाऱ्या तरुणाचे नाव हे छोटा सुंदर खोब्रागडे आहे. सीसीटीव्ही पाहिल्यानंतर दिसले की, खोब्रागडे हा एका घोड्यासोबत अश्लीत चाळे करत होता. त्याने घोड्याचे लैंगिक शोषण केले आहे.
या घटनेला पोलिसांनी दुजोरा देत घटनेसंबंधित माहिती दिली आहे. पोलीस अधिकारी म्हणाले की, अशा घृणास्पद विकृतीला गंभीरतेनं घेऊन आरोपींविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या आणि प्राण्यांवरील प्रतिबंधक कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आरोपी हा जेरबंद आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे समाजात राहणाऱ्या लोकांमधील मानसिकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे. या घटनेने नागपूरात संतापाची लाट उसळली आहे. प्राणी प्रेमींनी तसेच प्राणी हक्क संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. या घटनेच्या विरोधात आरोपींनी कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
हेही वाचा : "डिजीटल अरेस्ट" करणारे पुण्यातच सापडले, खराडीमध्ये मोठी कारवाई, 123 जण ताब्यात, हादरवून टाकणारी माहिती समोर
कुत्र्यावर लोखंडी रॉडने हल्ला
तर मध्यंतरी एका तरुणाने कुत्र्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला होता. ज्यात कुत्र्याच्या डोक्यात रॉड अडकून बसला होता. हे पाहून अनेक लोकांनी हळहळ व्यक्त केली. अशावेळी प्राणी मित्रांनी कुत्र्यावर उपचार केले होते.