नाश्ता, मटण, चिकन! वाल्मिक कराडला जेलमध्ये तब्बल 10 हजाराची... तुरुंगातून आलेले रंजीत कासले काय म्हणाले?
रंजीत कासले आणि वाल्मीक कराड हे दोघेही काही काळ बीड जिल्हा कारागृहात होते. कासले यांच्या या दाव्यामुळे कारागृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

बडतर्फ पोलीस निरीक्षक रणजीत कासले काय म्हणाले?

रणजीत कासलेने केले खळबळजनक दावे
Walmik Karad Beed : बीडच्या सायबर विभागातील बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक (PSI) रंजीत कासले यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याला बीड जिल्हा कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा गंभीर दावा कासले यांनी केला आहे. जामिनावर सुटल्यानंतर रंजीत कासले यांनी आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत या प्रकरणाची माहिती उघड केली.
हे ही वाचा >> एक्सप्रेस वेवर महिलेला वस्त्रहिन करून नेत्याचे खुलेआम शारीरिक संबंध, सगळा प्रकार CCTV मध्ये कैद
कासले यांनी सांगितले की, वाल्मीक कराडला जिल्हा कारागृहात विशेष सवलती दिल्या जात आहेत. त्याला चहा, विविध प्रकारचा नाश्ता, मटन, चिकन यासारख्या सुविधा पुरवल्या जात असून, त्याच्या नावावर 25 हजार रुपयांची आणि दुसऱ्या आरोपीच्या नावावर 10 हजार रुपयांची कॅन्टीन घेतली जात आहे. कासले यांनी आपल्या व्हिडिओतून कारागृह प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले असून, या विशेष ट्रीटमेंटमागील कारणांचा खुलासा होणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.
हे ही वाचा >> सख्ख्या आईसोबत मुलाचे अनैतिक संबंध, 9 वर्षाच्या मुलीने 'नको त्या अवस्थेत' पाहिलं अन् पुढे घडलं भयंकर!
रंजीत कासले आणि वाल्मीक कराड हे दोघेही काही काळ बीड जिल्हा कारागृहात होते. कासले यांच्या या दाव्यामुळे कारागृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी अधिकृत माहिती आणि तपासाची मागणी जोर धरत आहे.