छत्रपती संभाजीनगरमध्ये एन्काऊंटर! पोलिसांच्या चकमकीत ठार झालेला खोतकर कोण?

Gold Robbery Case: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल खोतकरने फक्त गाडी घालण्याचाच प्रयत्न केला नाही, तर रिव्हॉल्व्हरमधून पोलिसांवर गोळीबारही सुरू केला.

Mumbai Tak

मुंबई तक

27 May 2025 (अपडेटेड: 27 May 2025, 01:23 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री चकमक

point

आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिसांवरही हल्ला?

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये एक आरोपी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील बजाज नगर परिसरात काही दिवसांपूर्वी एका बड्या उद्योजकाच्या घरी दरोडा पडला होता. हा दरोडा घालणारा संशयित गुन्हेगार अमोल खोतकर याला पोलिसांनी चकमकीत ठार केलं. 

हे वाचलं का?

गुन्हे शाखेने सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अमोल खोतलकरला चकमकीत ठार केल्याची ही घटना घडली आहे. वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी भागात ही चकमक झाली असून, यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती की, बजाज नगर दरोड्याचा संशयित आरोपी अमोल खोतकर हा वडगाव कोल्हाटी परिसरात लपून बसला आहे.

पोलिसांना पाहताच खोतकरने काय केलं?

मिळालेल्या माहितीच्या आधारे सह-पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शाखेचे पथक त्याला अटक करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहताच खोतकरने पळून जाण्याचा प्रयत्न केला. तो गाडीतून पसार होण्याच्या तयारीत असताना त्याने पोलिसांच्या पथकावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे एक पोलीस कर्मचारी जखमी झाला.

पोलिसांवर गोळीबार, प्रत्युत्तरात खोतकर ठार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल खोतकरने फक्त गाडी घालण्याचाच प्रयत्न केला नाही, तर रिव्हॉल्व्हरमधून पोलिसांवर गोळीबारही सुरू केला. स्वसंरक्षणासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. या चकमकीत अमोल खोतकर गंभीर जखमी झाला आणि त्याला मृत घोषित करण्यात आले.

कोण होता खोतकर? 

अमोल खोतकर हा बजाज नगरातील एका बड्या उद्योजकाच्या घरी घडलेल्या दरोडा प्रकरणातील मुख्य संशयित होता. या दरोड्याने शहरात खळबळ उडाली होती, आणि पोलिसांवर गुन्हेगारांना पकडण्यासाठी तीव्र दबाव होता. या प्रकरणातला मुख्य सूत्रधार अमोल खोतकर होता अशी माहिती समोर आली आहे. आता हाच ठार झाल्याने तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, या चकमकीबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

पोलीस कर्मचाऱ्यावर उपचार 

चकमकीदरम्यान जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

 

    follow whatsapp