Meerut news : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत होता. तो व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. व्हिडिओ पाहिल्यास कळते की, एका तरुणाने महिलेवर विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. बुरखा घातलेल्या महिलेकडे तो तरुण येतो, तिचा किस घेतो आणि घटनास्थळावरून पळून जातो. तरुणाचे नाव सोहेल असून तो मेरठमधील लिसाडी येथील लख्खीपुराचा राहिवासी आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : व्हिडिओ कॉल कर नाहीतर तुला...शिक्षकाने विद्यार्थीनीला दिली धमकी
या घडलेल्या घटनेदरम्यान, तरुणाने असे कृत्य करुन तो त्या ठिकाणाहून पळून गेला. अनेकांनी सोहेलला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र, तो घटनास्थळी असणाऱ्या कोणाच्याही हाती लागला नाही. हा संबधित व्हिडिओ समोर आल्यानंतर महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण होत आहे. या प्रकरणात आता मेरठ पोलिसांनी कारवाई केली आणि आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी आरोपी सोहेलला शिकवली अक्कल
मेरठमधील लिसाडी गेट पोलीस ठाणे हद्दीतील अहमदनगर परिसरात एका बुरखा परिधान करणाऱ्याला महिलेसोबत सोहेलने अश्लील कृत्य केलं आहे. याच कृत्याविरोधात पोलिसांनी सोहेलला ताब्यात घेतलं आणि अटक केली. आता सोहेल पोलीस कोठडीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
व्हिडिओत पाहिल्यास सोहेल त्याचे कान धरून माफी मागत आहे. माफी मागतानाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो कान धरून 'मी पुन्हा असे कधीही करणार नाही', असे म्हणत त्याने केलेल्या कृतीवर पश्चात्ताप व्यक्त करत आहे.
हेही वाचा : छत्रपती संभाजीनगरमध्ये एन्काऊंटर! पोलिसांच्या चकमकीत ठार झालेला खोतकर कोण?
काय म्हणाले पोलीस?
मेरठ पोलिसांनी सांगितलं की, संबंधित व्हिडिओ हा लिसाडी गेटवरुन समोर आला आहे. व्हिडिओच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
