Kalyan Crime: 4 वर्षाच्या मुलाचं अपहरण, आरोपी म्हणाला, ‘देवाने चार मुली दिल्या, पण…’

मिथिलेश गुप्ता

08 Aug 2023 (अपडेटेड: 08 Aug 2023, 02:29 PM)

कल्याण रेल्वे स्टेशनवरून एका व्यक्तीने चार वर्षाच्या मुलाचं अपहरण केले. तो नाशिकचा रहिवाशी आहे.

mumbaitak

mumbaitak

follow google news

Kalyan Kidnapping News : कल्याणमध्ये एक विचित्र घटना घडली. एका व्यक्तीने रेल्वे स्टेशनवरील वेटिंग रुममधून चार वर्षाच्या मुलाचं अपहरण केले. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवली आणि मुलाची सुटका केली. आरोपीने अपहरणाचं कारण सांगितल्यानंतर पोलिसही चक्रावून गेले.

हे वाचलं का?

कल्याण रेल्वे स्टेशनवरील वेटिंग रुममधून 4 वर्षाचा मुलगा बेपत्ता झाला. कल्याण पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुलाचा शोध सुरू केल्यानंतर 8 तासांत यश आले. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली. चौकशी मुलाच्या अपहरणाचं कारण समोर आले.

आरोपीने कसं केलं मुलाचं अपहरण?

करण गुप्ता आणि त्याची पत्नी शुभांगी गुप्ता हे कल्याणमध्ये मजुरीचं काम करतात. त्यांना एक दोन वर्षाची कीर्ती नावाची मुलगी आहे, तर चार वर्षाचा अथर्व मुलगा आहे.

वाचा >> PUBG गेम खेळताना मैत्री, तरुणीला हॉटेलवर बोलवून न्यूड Video केला शूट; अन्…

महिला सोमवारी ते कपडे धुण्यासाठी कल्याण स्टेशनवरील वेटिंग रुममध्ये आली होती. पण, महिला साबण घरीच विसरली. मुलांना तिथेच सोडून महिला साबण आणण्यासाठी निघून गेली.

दोन्ही मुलं इतर मुलींसोबत खेळत होती. तसेच मुलींचे आईवडील तिथे होते. त्यानाच मुलावर लक्ष ठेवायला सांगून शुभांगी गुप्ता साबण आणण्यासाठी स्टेशन बाहेर गेल्या.

महिला परत येईपर्यंत मुलगा बेपत्ता

जेव्हा शुभांगी आणि करण स्टेशनवर आले, तेव्हा त्यांना तिथे खेळत असलेल्या चार मुली, त्यांचे आईवडिलांबरोबर त्यांचा मुलगा अथर्वही नसल्याचे दिसले. त्यांनी रेल्वे स्टेशनवर अथर्वचा शोध घेतला. मुलगा कुठेच न सापडल्याने दाम्पत्याने रेल्वे पोलीस गुन्हे शाखेत गेले.

वाचा >> Mumbai : डब्यात घुसला, जबरदस्ती अन् धावत्या ट्रेनमधून महिलेला दिलं ढकलून

करण गुप्ता आणि शुभांगी गुप्ता यांनी पोलिसांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यानंतर पोलिसांनी एक पथक तयार केले आणि मुलाचा शोध सुरू केला. पोलिसांनी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज बघितले. त्यात एक व्यक्ती अथर्वला घेऊन बाहेर जाताना दिसला.

पुन्हा कल्याण रेल्वे स्टेशनवर आला आणि फसला

दरम्यान, रात्री आठ वाजता एक व्यक्ती अथर्व कल्याण रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर घेऊन आला. त्यावेळी ही बाब पोलिसांना दिसून आली. हा व्यक्ती अथर्वला घेऊन जालन्याला निघाला होता. पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला ताब्यात घेतले आणि अथर्वची त्याच्या तावडीतून सुटका केली.

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली. आरोपीने त्याचे नाव कचरू वाघमारे उर्फ बाळा असे सांगितले. तो नाशिकचा रहिवाशी आहे. त्याने सांगितले की, ‘देवाने 4 मुली दिल्या. पण एकही मुलगा दिला नाही. मुलगा हवा म्हणून अथर्वचे अपहरण केले.’

    follow whatsapp