Kanpur Crime : पाणी भरण्यावरुन सुरु झालेल्या वादानंतर पत्नीने तिच्या नवऱ्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय. उत्तरप्रदेशच्या कानपूर जिल्ह्यातील अनवरगंजमध्ये हा प्रकार घडलाय. पाणी भरण्यावरुन सुरु झालेल्या वादानंतर पत्नीचा राग अनावर झाला आणि तिने नवऱ्याचा कानाच्या चावा घेत अक्षरश: तुकडा पाडलाय. दरम्यान, जखमी अवस्थेत पती अमित सोनकर पोलीस ठाण्यात पोहोचलाय. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. या दाम्पत्यामध्ये या आधी देखील बराच वाद झालाय. त्यामुळे दोघांनी घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा देखील ठोठावला होता.
ADVERTISEMENT
घटस्फोटासाठी न्यायालयात गेलेले असतानाच पत्नी जीवावर उठली
कोणत्या पती-पत्नीमध्ये वाद होत नाही? असं बोललं जातं. मात्र, उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यात या वादानंतर पत्नी पतीच्या जीवावर उठलेली पाहायला मिळाली. पत्नी तिच्या नवऱ्याचा कान दातांनी चावला आणि तुकडा पाडलाय. शिवाय नवऱ्याला तिने बेदम मारहाण देखील केली आहे. त्यानंतर नवऱ्याने पत्नीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पत्नीविरोधात गुन्हा दाखल केलाय. शिवाय, पोलिसांनी पीडित पतीला मेडिकल चेकअपसाठी रवाना केलंय.
अधिकची माहिती अशी की, कानपूरच्या अनवरगंज येथे राहाणारा पीडित अमित सोनकर याचं एका मुलीसोबत अफेअर सुरु होतं. ही मुलगी त्याच्या शेजारीच राहात होती. दोघं इतके प्रेमात पडले की, त्यांना आठ वर्षांपूर्वी त्यांना लग्न करावं लागलं. दोघांचा संसार व्यवस्थित सुरु होता. मात्र, काही काळानंतर दोघांमध्ये सातत्याने वाद होऊ लागले. त्यानंतर अमित सोनकरने घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, मंगळवारी दाम्पत्यामध्ये पाणी भरण्यावरुन वाद सुरु झालाय.
पती पत्नीमधील हा वाद मंगळवारी इतका टोकाला पोहोचला की, अमितला त्याच्या पत्नीने बेदम मारहाण केली. एवढंच नाही तर अमितने मारहाण करणाऱ्या पत्नीपासून बचावासाठी दूर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्नीने यावेळी त्याचा अर्ध्या कानाचा चावून तुकडा पाडलाय. अमितचा संपूर्ण चेहरा रक्ताने माखलेला होता. तो अशा अवस्थेत पोलीस ठाण्यात पोहोचला. पोलिसांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय.
हेही वाचा : 'त्या' रात्री विवाहिता दाजीसोबतच झाली फरार! पती रडत-रडत थेट पोलिसात... नेमकं काय घडलं?
पोलीस काय म्हणाले?
एडीसीपी सेंट्रल महेश कुमार याबाबत बोलताना म्हणाले, पती-पत्नी घटस्फोट मिळावा यासाठी न्यायालयात गेले आहेत. त्यांची न्यायालयात केस सुरु आहे. त्यामुळेच त्यांच्यामध्ये हा वाद झालाय. दोघांमध्ये हाणामारी देखील झालीये. पतीने पत्नीविरोधात कान कापल्यामुळे तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणाचा तपास आम्ही सुरु केलाय.
ADVERTISEMENT
