Delhi Crime : दिल्लीच्या जामिया नगरमधील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका घरात तब्बल तीन दिवस महिलेचा मृतदेह बंद खोलीत आढळून आला होता. त्याच महिलेच्या बाजूला तिचा मुलगा बसून राहिला होता. मृतदेह बंद खोलीत काही दिवस ठेवूनही तरुणाने आपल्या आईची मृत्यूबाबतची माहिती कोणालाही दिलीच नाही, दरम्यान हे प्रकरण दिल्लीतील असल्याचं समजतंय.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : देवीचं दर्शनंही घेता आलं नाही! ज्योत आणायला गेला अन् घाटात वाहन झालं पलटी, तरुणाचा मृत्यू आणि 11 जणं...
नेमकं काय घडलं?
घरातून कसलाही आवाज न आल्याने शेजाऱ्यांनी संबंधित प्रकरणाची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता, हे प्रकरण समोर आलं. संबंधित प्रकरणाची पोलिसाना माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल करण्यात आलं. घरात प्रवेश केल्यानंतरही, परिस्थिती पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. तसेच त्यांना आश्चर्याचा मोठा हादरा बसला होता. जामिया नगर परिसरातील एका फ्लॅटमध्ये महिलेचा मृतदेह हा संशयास्पद परिस्थितीत आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आईच्या मृतदेहाजवळ मुलगा बसून राहिला...
दरम्यान, आईच्या मृतदेहाजवळच मुलगा बसला होता. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला होता. अशातच या प्रकरणाची पुढील चौकशी सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या मुलाला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. धक्कादायक घटनेनंतर फ्लॅट सील करण्यात आले होते.
हे ही वाचा : ज्योत आणताना दोन मोटारसायकल एकमेकांवर आदळल्या... एकाच दिवशी बीडमध्ये दोन अपघात, नेमकं रात्री घडलं काय?
दरम्यान, आता पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. फ्लॅटमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शेजाऱ्यांकडूनच पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली आहे. पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर महिलेच्या मृत्यूचं ठोस कारण समोर येईल, असे सांगितले गेले.
ADVERTISEMENT
