देवीचं दर्शनंही घेता आलं नाही! ज्योत आणायला गेला अन् घाटात वाहन झालं पलटी, तरुणाचा मृत्यू आणि 11 जणं...

मुंबई तक

Saptshrung Accident : सप्तश्रृंग गडावर नवरात्रोत्सवानिमित्त ज्योत आणण्यासाठी मालेगाव तालुक्यात गेलेल्या वाहनाचा अपघात झाला. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची मन सुन्न करून टाकणारी घटना समोर आली.

ADVERTISEMENT

saptshrung accident 
saptshrung accident 
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ज्योत आणणाऱ्या तरुणावर काळाचा घाला

point

एकाचा मृत्यू अन् 11 जण जखमी

point

नेमकं घाटात काय घडलं?

Saptshrung Accident : नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंग गडावर नवरात्रोत्सवानिमित्त ज्योत आणण्यासाठी मालेगाव तालुक्यात गेलेल्या वाहनाचा अपघात झाला. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची मन सुन्न करून टाकणारी घटना समोर आली. उमेश सोनवणे (वय 17) असे मृत्य तरुणाचे नाव आहे. तसेच त्यांच्यासह इतर 11 जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. ही घटना नवरात्रोत्सवाच्या काही तासांआधी म्हणजे 21 सप्टेंबर रोजी रविवारी घडली.

हे ही वाचा : कोकणातील रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना परतीचा पाऊस झोडपणार, तर इतर विभागात पावसाची स्थिती काय?

एकाचा मृत्यू आणि एकूण 11 जण जखमी 

स्थानिकांनी आणि भक्तांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळपणे वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या एकूण जखमींमध्ये रवींद्र सोनवणे, अशोक सोनवणे, बबलू सोनवणे, किरण सोनवणे, दादाभाऊ भवर, साईनाथ सोनवणे, सुनील सोनवणे, बादल सोनवणे यांचा समावेश होता. तसेच इतरही काही कार्यकर्त्यांना किरकोळ जखम झाल्याचं सांगण्यात येत आहे. किरकोळ जखमींना प्राथमिक उपचारानंतर सुखरूपपणे घरी पोहोचवण्यात आल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं.

सप्तश्रृंग गडावर भाविकांची गर्दी

नवरात्रोत्सवानिमित्त या सप्तश्रृंग गडावर अनेक भाविकांची गर्दी बघायला मिळते. महाराष्ट्राचे आराध्य दैवतांपैकी सप्तश्रृंगी त्यापैकी देवस्थान आहे. नाशिक आणि खांदेशच नाही,तर संपूर्ण राज्यभरातून असंख्य लोक देवीकडे आपलं साकडं मागायला येतात. आज 22 सप्टेंबर रोजी सोमवारी सकाळी सत्र न्यायाधीश अभय लाहोटी यांच्या हस्ते देवीची पंचामृताने महापूजा करण्यात आल्याचं माध्यमांचं वृत्त आहे.

हे ही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदींची जीएसटी कराबाबत मोठी घोषणा, दैनंदिन वस्तूंवर 'एवढा' कर, तर हॉटेल्ससह इतर वस्तूंना...

तसेच सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास देवीसमोर घटस्थापना करण्यात आली होती. तसेच या नवरात्रौत्सवाच्या काळात पालखीचं पूजन केलं जातं आणि हा मोठा उत्सव असतो. नऊ दिवस असंख्य भाविक हे देवीकडे येतात आणि मनोभावे पूजाआर्चा करतात.

हे वाचलं का?

    follow whatsapp