ज्योत आणताना दोन मोटारसायकल एकमेकांवर आदळल्या... एकाच दिवशी बीडमध्ये दोन अपघात, नेमकं रात्री घडलं काय?

मुंबई तक

Beed news : बीडमध्ये एकाच रात्री दोन भीषण अपघात झाले होते. एका अपघातात वाहन पलटी झाल्याने ड्रायव्हरचा मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या घटनेत तरुण ज्योत आणण्यासाठी तुळजापुरकडे जात असताना अपघातात मृत पावला.

ADVERTISEMENT

Beed news
Beed news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ज्योत आणताना दोन मोटारसायकल एकमेकांवर आदळल्या...

point

बीडमध्ये एका रात्रीत दोन अपघात

point

नेमकं काय घडलं?

Beed News : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाणे हद्दीत भीषण अपघाताच्या दोन भयंकर घटना उघडकीस आल्या आहेत. या अपघातांमध्ये एकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तसेच चार जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. यापैकी एका घटनेमध्ये कलरचे डब्बे वाहनाऱ्या ट्रकचा अपघात झाला होता. यात ट्राकच्या केबिनमध्ये अडकलेल्या ड्रायव्हरला वाचवण्यासाठी काही पोलीस अधिकाऱ्यांनी स्वत: चा जीव धोक्यात घालत एकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तसेच दुसऱ्या अपघातात, देवीची ज्योत आणण्यासाठी तुळजापूरकडे गेलेल्या दोन मोटारसायकलीच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाल्याचा मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हे ही वाचा : देवीचं दर्शनंही घेता आलं नाही! ज्योत आणायला गेला अन् घाटात वाहन झालं पलटी, तरुणाचा मृत्यू आणि 11 जणं...

ट्रक खड्यात जाऊन पलटी

माळेगावहून अंबेजोगाईकडे जाणाऱ्या कलरचे डब्बे वाहून नेणारा एक ट्रक सुकळी गावातील वळणावर पाईपलाईनचे काम सुरु असल्याने खड्ड्यातच पलटी झाला. या अपघातात ट्रकची केबिन पूर्णपणे तुटून निघाली होती. याच अपघातात पश्चिम बंगालचा वाहनचालक सिकंदर गंभीर जखमी होऊन वाहनातच अडकून बसला होता. या गंभीर अपघातामुळे कलरचे डब्बे सर्वत्र पडले होते आणि यामुळे हा भाग निसरडा झाला. मात्र, अशा स्थितीत काही पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्यास सुरुवात केली होती.

कलरचे अनेक डब्बे पडल्याने तरुणाच्या कपड्याला रंग लागला होता. पोलिसांनी कसलीही परवा न करता दोन तासांचा वेळ देत गंभीर झालेल्या सिंकंदरला बाहेर काढले होते. अपघातात गंभीरपणे जखमी झालेल्या सिकंदरला बाहेर काढण्यासाठी अपघातात गंभीर झालेल्या ड्रायव्हरसमोर एक तास वेदनेनं तळमळ व्यक्त करत 108 क्रमांकावर फोनद्वारे संपर्क करत दीड तासानंतर अॅम्ब्युलन्स पोहोचली आणि त्यानंतरच नागरिकांनी संताप व्यक्त केला होता.

ज्योत आणताना दोन मोटारसायकल एकमेकांवर आदळल्या...

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कळंब ते माळेगाव दरम्यान, मांगवडगाव जवळील असलेल्या नदीच्या पुलावर देवीची ज्योत आणण्यासाठी तुळजापूरकडे जाणाऱ्या दोन मोटारसायकलमध्ये धडक झाली. या धडकेत गोविंद शेषेराव नवले राहणार केज तालुक्यातील कोठी या ग्रामीण भागातील रहिवासी असलेल्या या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला.

हे वाचलं का?

    follow whatsapp