Crime News: उत्तर प्रदेशातील हाथरस येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे पाच जणांनी मिळून एका विवाहित महिलेवर वर्षभर सामूहिक बलात्कार केल्याचं वृत्त समोर आलं आहे. पीडित महिला ही एका वर्षापूर्वीच तिच्या मुलासह घराबाहेर पडली असल्याची माहिती आहे. त्यानंतर तिने एका दुसऱ्या समुदायातील तरुणासोबत लग्न केले. पण, त्या तरुणाने आपल्या चार मित्रांसह वर्षभर त्या महिलेवर शारीरिक अत्याचार केल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT
एके दिवशी, पीडित महिलेने कशीबशी आरोपी तरुणांच्या तावडीतून सुटका मिळवली. तिथून पळून आल्यानंतर पीडितेने तिच्या आईला तिच्यासोबत घडलेल्या संपूर्ण घटनेची माहिती सांगितली. ती म्हणाली की, "मी एका आकाश नावाच्या तरुणासोबत लग्न केलं होतं. खरंतर, तो दुसऱ्या समुदायाचा होता. मात्र, त्याने त्याची खरी ओळख माझ्यापासून लपवून ठेवली आणि माझी फसवणूक केली. लग्नानंतर त्याने मला बंदीस्त ठेवलं आणि त्याच्या 4 मित्रांसोबत मिळून तो माझ्यावर सामूहिक अत्याचार करत राहिला. जवळपास वर्षभर तो माझ्यासोबत घृणास्पद कृत्य होता. दररोज माझ्यासोबत बलात्कार केला जायचा. कशीबशी मी त्यांच्या तावडीतून सुटून इथे आले."
कित्येक वेळा प्रयत्न केले पण...
त्यानंतर आई तिच्या मुलीला सोबत घेऊन आपल्या घरी परतली. त्यावेळी दोघींनी मिळून पोलिस स्टेशनकडे धाव घेतली आणि आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. पीडितेने सांगितले की, "मला माझ्या नवऱ्याने फसवलं. माझ्यासोबत लग्न करून तो सतत माझ्यावर अत्याचार करत राहिला. त्याच्या मित्रांसोबत मिळून माझ्यावर सामूहिक बलात्कार केला जायचा. मी त्यांच्या तावडीतून कित्येक वेळा पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मला बंदीस्त ठेवलं होतं."
हे ही वाचा: मुंबईची खबर: आता अपघातांची चिंताच मिटली! मुंबईत ‘या’ नव्या सिस्टीमच्या आधारे धावणार मोनोरेल...
पीडितेच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी आरोपींविरुद्ध FIR दाखल केला. सध्या, पोलिसांकडून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध घेण्यास सुरू आहे. लवकरच उर्वरित आरोपींना ताब्यात घेणार असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
हे ही वाचा: अनैतिक संबंधातून जीवघेणा खेळ! जावई सासरी गेला अन् पत्नीसह ‘त्या’ लोकांना सुद्धा... नेमकं काय घडलं?
बनावट आधारकार्ड दाखवून लग्न...
संबंधित प्रकरण हे मुरसान पोलीस स्टेशन परिसरातील असल्याची माहिती आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, एक वर्षापूर्वी तिची मुलगी आपल्या मुलासोबत तिचं घर सोडून निघून गेली. त्यावेळी कुटुंबियांनी तिला खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हा ती कुठेच सापडली नाही. नुकतंच, हाथरस गेट पोलिस स्टेशन परिसरातील रहिवासी असलेल्या आकाश नावाच्या तरुणाने मुलीशी लग्न केले असल्याचं पीडितेने फोन करून सांगितलं. मात्र, काही दिवसांनंतर सत्य घटना उघडकीस आली. खरंतर, त्या तरुणाने पीडितेला बनावट म्हणजे खोटं आधारकार्ड दाखवून तिच्यासोबत लग्न केलं होतं. पीडितेने आपल्या घरी परत जाण्याचं सांगितलं असता तिला बंदीस्त ठेवण्यात आलं. लग्नानंतर, पीडितेचा नवरा त्याच्या मित्रांसोबत मिळून पीडितेसोबत बलात्कार करत राहिला.
ADVERTISEMENT
