मुंबईची खबर: आता अपघातांची चिंताच मिटली! मुंबईत ‘या’ नव्या सिस्टीमच्या आधारे धावणार मोनोरेल...
देशातील पहिल्या मोनोरेलमधील टेक्निकल त्रुटी दूर करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सिग्नल यंत्रणेत बदल करण्यास सुरुवात केली असल्याची बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुंबईत ‘या’ नव्या सिस्टीमच्या आधारे धावणार मोनोरेल...

काय आहे ही नवी प्रणाली?
Mumbai News: देशातील पहिल्या मोनोरेलमधील टेक्निकल त्रुटी दूर करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सिग्नल यंत्रणेत बदल करण्यास सुरुवात केली आहे. मोनोरेलचा प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी, एमएमआरडीए (MMRDA)ने मोनोरेल मार्गिकेवर मेट्रोची सिग्नल प्रणाली स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. एमएमआरडीए संचालित मेट्रो 7 आणि मेट्रो 2A कॉरिडॉरमध्ये सीबीटीसी सिग्नलिंग सिस्टीमचा वापर केला जातो. सीबीटीसी टेक्नॉलॉजीमुळे नेहमीच रेल्वेचं रिअल-टाइम निरीक्षण करता येतं.
ट्रॅकला ब्लॉक्समध्ये विभाजित...
यामध्ये ट्रेन आणि कंट्रोल सेंटर दरम्यान, सतत डेटा कम्युनिकेशनचा वापर होतो, ज्यामुळे ट्रेनचं स्थान आणि वेग याबद्दल माहिती मिळते. मोनोरेलची जुनी सिग्नलिंग सिस्टीम पूर्णपणे स्वयंचलित नाही, कारण मोनो ट्रॅकला ब्लॉक्समध्ये विभाजित करण्यात आलं आहे. एका वेळी फक्त एकच ट्रेन ब्लॉकमधून जाते. गाडी सुरू करणं, थांबवणं, ब्रेक लावणं आणि इतर कामे मॅन्युअली केली जातात. जुन्या सिग्नल सिस्टीममध्ये बरीच कामे मॅन्युअल स्वरूपाची असल्याने मेन्टेनन्ससाठी बराच वेळ लागतो.
हे ही वाचा: Govt Job: ‘इंजिनीयरिंग’ची डिग्री प्राप्त उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! त्वरीत करा अर्ज...
.... तर ट्रेन आपोआप थांबते
मोनो ट्रेनमध्ये बसवलेली CBTC सिग्नल सिस्टीम केवळ ट्रेनचा वेग नियंत्रित करत नाही तर ड्रायव्हरला रस्त्याच्या परिस्थितीची देखील माहिती देते. ड्रायव्हर ब्रेक लावायला विसरला तरीही ट्रेन आपोआप थांबते, हे त्याचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. नवीन सिस्टीममध्ये, ड्रायव्हरला फक्त सिग्नल सिस्टीमचं निरीक्षण करावं लागतं आणि उर्वरित काम ट्रॅकवर बसवलेल्या सेन्सर सिग्नल कंट्रोल युनिटद्वारे केलं जातं.
हे ही वाचा: मुंबईची खबर: मुंबईकरांसाठी लवकरच खुला होणार ‘हा’ उड्डाणपूल... कुठून कुठपर्यंत असेल रूट? बीएमसीची नवी अपडेट
‘इतक्या’ ठिकाणी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग
संपूर्ण मोनोरेल मार्गिकेवर 32 ठिकाणी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग बसवण्यात येणार आहेत. 32 पैकी पाच ठिकाणी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग बसवण्याचे काम पूर्ण झालं असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, 260 वायफाय अॅक्सेस पॉइंट्स, 500 आरएफआयडी उपकरणे आणि 90 ट्रेन डिटेक्शन सिस्टम बसवण्याचे काम पूर्ण झालं असल्याचं सांगण्यात येत आहे.