अनैतिक संबंधातून जीवघेणा खेळ! जावई सासरी गेला अन् पत्नीसह ‘त्या’ लोकांना सुद्धा... नेमकं काय घडलं?
अनैतिक संबंधांच्या संशयावरून आरोपीने आधी एका पुरूषाची चाकूने वार करून हत्या केली आणि नंतर त्याची पत्नी, सासू आणि घरातील इतर सदस्यांवरही हल्ला केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अनैतिक संबंधातून जीवघेणा खेळ!

जावई सासरी गेला अन् पत्नीसह ‘त्या’ लोकांना सुद्धा...
Crime News: अनैतिक संबंधातून बरीच हत्याकांडाची प्रकरणे समोर येत असल्याचं आपण पाहतो. राजस्थानमधील कोटा येथील बोरखेडा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मंडीपाडा परिसरात अशीच एक घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथे दीपक नावाच्या तरुणाने आपल्या सासरी पोहचून जीवघेणा खेळ केल्याची बातमी समोर आली आहे. अनैतिक संबंधांच्या संशयावरून आरोपीने आधी एका पुरूषाची चाकूने वार करून हत्या केली आणि नंतर त्याची पत्नी, सासू आणि घरातील इतर सदस्यांवरही हल्ला केला.
अनैतिक संबंध सुरू असल्याचा संशय
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दीपकला त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध सुरू असल्याचा संशय होता. या संशयामुळे दोघांमध्ये बराच काळ वाद सुरू होता. संतापलेल्या दीपकने त्याच्या सासरच्या घरी पोहोचल्यानंतर आपल्या पत्नीवर हल्ला केला.
हे ही वाचा: मध्यरात्री सुनेच्या खोलीत सोडला साप अन्... केवळ ‘त्या’ एका मागणीमुळे सुनेवर जीवघेणा हल्ला! बहिणीने सगळंच सांगितलं...
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी...
घटनेदरम्यान, आरोपी पतीने हल्ला केल्यानंतर पीडित तरुण रक्ताच्या थारोळ्यात कोसळला तेव्हा तिथल्या स्थानिकांनी आरोपीला पकडून बेदम मारहाण केली. दरम्यान, पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले आणि आरोपीला पोलिस ठाण्यात नेण्यात आलं.
हे ही वाचा: खोलीत विधवा सून ‘त्या’ अवस्थेत... सासऱ्याने पाहिलं अन् घडला भयानक प्रकार! मध्यरात्री नेमकं काय घडलं?
पोलिसांचा तपास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दीपक हा बारां जिल्ह्यातील नागदा गावचा रहिवासी आहे. घटनेनंतर त्याला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली. प्राथमिक तपासात हे प्रकरण कौटुंबिक वाद आणि अनैतिक संबंधांच्या संशयाशी जोडलेलं असल्याचे दिसून येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. बोरखेडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून जखमी पत्नी आणि सासूला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रकरणाच्या सर्व पैलू लक्षात घेऊन तपास सुरू असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. ही घटना इतकी भयानक होती की त्यामुळे संपूर्ण परिसरातील लोक हादरून गेले आहेत. यामुळे लोकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत असून संबंधित कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.