मध्यरात्री सुनेच्या खोलीत सोडला साप अन्... केवळ ‘त्या’ एका मागणीमुळे सुनेवर जीवघेणा हल्ला! बहिणीने सगळंच सांगितलं...
हुंड्याच्या मागण्या पूर्ण न केल्याने सासरच्या लोकांनी त्यांच्या सुनेला मारहाण केली. त्यानंतर, त्यांनी तिला एका खोलीत बंद केलं आणि मध्यरात्री तिच्या खोलीत एक साप सोडला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मध्यरात्री सुनेच्या खोलीत सोडला साप अन्...

केवळ ‘त्या’ एका मागणीमुळे सासरच्याचं भयंकर कृत्य...
Crime News: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये हुंड्यासाठी सासरच्या लोकांचं एक धक्कादायक कृत्य उघडकीस आलं आहे. हुंड्याच्या मागण्या पूर्ण न केल्याने सासरच्या लोकांनी त्यांच्या सुनेला मारहाण केली. त्यानंतर, त्यांनी तिला एका खोलीत बंद केलं आणि मध्यरात्री तिच्या खोलीत एक साप सोडला. पीडित महिला अत्यंत घाबरली आणि खूप ओरडत होती, पण कोणीही त्यावेळी तिच्या मदतीसाठी गेलं नाही. अखेर, सापाने तिला चावलं आणि यामुळे तिची तब्येत बिघडली. त्यानंतर, कशीबशी ती तिच्या माहेरच्या घरी पोहोचली. तिथून तिला ताबडतोब एलएलआर रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे तिची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.
हे प्रकरण कर्नलगंज पोलिस स्टेशन परिसरातील असल्याची माहिती आहे. पीडितेच्या बहिणीने पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी पीडितेच्या पतीसह तिच्या सासरच्या सात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. चमनगंज येथील रहिवासी रिजवानाच्या म्हणण्यानुसार, तिची बहीण रेश्मा हिचं लग्न 19 मार्च 2021 रोजी कर्नलगंज येथील शाहनवाज खान उर्फ अयानशी झालं होतं. लग्नानंतर सुरुवातीचे दिवस खूप चांगले गेले, पण काही दिवसांतच सासरच्यांनी सुनेकडे हुंडा म्हणून दोन लाख रुपये मागण्यास सुरुवात केली. शेवटी, रेश्माच्या कुटुंबियांनी तिच्या सासरच्या लोकांच्या बँक खात्यात दीड लाख रुपये पाठवले. मात्र, त्यानंतर सुद्धा सासरच्यांनी आणखी पाच लाख रुपयांची मागणी करण्यास सुरुवात केली.
हे ही वाचा: निष्पाप मुलीला फूस लावून खोलीत नेलं... 10 वर्षांच्या पीडितेवर सामूहिक बलात्कार! रडत रडत घरी आली अन्...
रिजवानाच्या म्हणण्यानुसार, पीडित महिलेचा पती अयान, सासू शमशाद बेगम, सासरे उमर, दीर इम्रान, नणंद आफरीन, अमरीन आणि समीरा यांनी रेश्माला कमी हुंडा दिल्याबद्दल टोमणे मारले आणि पीडितेचा मानसिक तसेच शारीरिक छळ केला.
खोलीत बंद करून आत साप सोडला
रेश्माने तीन वर्षांपूर्वीच एका मुलीला जन्म दिला होता. 19 सप्टेंबरच्या रात्री तिच्या सासरच्या लोकांनी तिला तिच्या मुलीपासून वेगळे केलं आणि एका खोलीत बंद केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजताच्या सुमारास, रेश्माला तिच्या पलंगावर एक काळा साप दिसला आणि त्याने तिच्या उजव्या पायाला चावा घेतला. त्यावेळी पीडिता ओरडल्यानंतर तिच्या सासरच्यांनी दार उघडलं आणि रेश्मा तिच्या आईवडिलांच्या घरी धावत गेली. तिथून तिला आधी उर्सुला रुग्णालयात आणि नंतर एलएलआर रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.