Crime News : एका रुग्णालयाच्या शौचालयात नर्सचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कोलकाता येथील नीलरतन सरकार (NRS) मेडिकल कॉलेजमध्ये बुधवारी रात्री ही घटना उघडकीस आली. रुपाली बर्मन असं या मृत स्टाफ नर्सचं नाव आहे. घटना घडली त्यादिवशी रुपाली नाईट ड्युटीवर होत्या. कामावर आल्यानंतर काही वेळाने त्या शौचालयात गेल्या आणि बराच वेळ बाहेर आल्याच नाहीत. आतून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि पोलिसांनी बंद दरवाजा तोडून त्यांचा मृतदेह बाहेर काढला.
ADVERTISEMENT
शौचालयात झाला शेवट
मिळालेल्या माहितीनुसार, स्टाफ नर्स रुपाली बर्मन बुधवारी रात्री सुमारे 8 वाजता आपल्या नाईट शिफ्टसाठी रुग्णालयात आल्या होत्या. कर्तव्यावर असताना रात्री 9 ते 10 वाजेच्या दरम्यान त्या शौचालयात गेल्या. बराच वेळ उलटूनही त्या बाहेर न आल्यामुळे सहकाऱ्यांनी त्यांना हाक मारण्यास सुरुवात केली, परंतु आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सहकाऱ्यांची चिंता अधिकच वाढली. यामुळे चिंताग्रस्त झालेल्या सहकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले.
हे ही वाचा : विवाहित प्रियकरावर लग्नासाठी दबाव टाकणे जीवावर बेतले, बेबीची क्रूरपणे हत्या
कर्मचाऱ्यामध्ये भीतीचे वातावरण
घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांनी सुरुवातीला बाहेरून हाक मारून प्रतिसाद मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र आतून काहीच उत्तर न आल्याने अखेर दरवाजा तोडण्यात आला. शौचालयाच्या आत रुपाली यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्णांमध्ये भीती व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला असून, पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हे ही वाचा : फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये रक्तरंजित कांड, बापाने पोटच्या मुलींना संपवले; नेमकं कारण काय?
आत्महत्या की हत्या?
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या तपासासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे. फॉरेन्सिक पथक घटनास्थळाची सखोल पाहणी करून आवश्यक पुरावे गोळा करत आहे. दुसरीकडे, पोलीस रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची चौकशी करत असून नर्सच्या हालचालींशी संबंधित माहिती एकत्र करत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या मते शवविच्छेदन अहवाल, फॉरेन्सिक तपासणी आणि इतर पुराव्यांच्या आधारेच पुढील चित्र स्पष्ट होईल. मात्र आतापर्यंत झालेल्या तपासात आत्महत्येची कोणतीही खूण आढळून आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसून पोलीस या प्रकरणाचा वेगाने तपास करत आहेत.
ADVERTISEMENT












